'पंचायत' सीरिजमधील 'या' अभिनेत्याची चाहती आहे आलिया भट, एकत्र केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 01:37 PM2024-10-21T13:37:14+5:302024-10-21T13:38:15+5:30

आलिया भटने त्या अभिनेत्याच्या डान्सचं केलेलं कौतुक

Alia Bhatt is fan of Banrakas aka Durgesh Kumar from Panchayat webseries | 'पंचायत' सीरिजमधील 'या' अभिनेत्याची चाहती आहे आलिया भट, एकत्र केलंय काम

'पंचायत' सीरिजमधील 'या' अभिनेत्याची चाहती आहे आलिया भट, एकत्र केलंय काम

अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) नुकतीच 'जिगरा' सिनेमात दिसली. बहीण भावाच्या नात्यावर आधारित या सिनेमातील आलियाच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. यापूर्वीही 'हायवे' या आपल्या दुसऱ्याच सिनेमात आलियाने अप्रतिम काम केलं होतं. याच सिनेमात 'पंचायत' सीरिज फेम अभिनेताही होता ज्याच्या कामाची आलिया चाहती आहे. तो अभिनेता आहे दुर्गेश कुमार (Durgesh kumar). 

दुर्गेश कुमारने 'पंचायत' सीरिजमध्ये बनराकसची भूमिका साकारली. त्याला या भूमिकेमुळे खूप लोकप्रियता मिळाली. दुर्गेशने आलियाच्या 'हायवे' सिनेमात काम केलं होतं असा खुलासा त्याने नुकताच केला. तो म्हणाला, "जेव्हा मी पहिल्यांदा हायवेच्या सेटवर आलिया भटला भेटलो तेव्हा ती एकदम चुलबुली वाटली. माझे तिच्यासोबत बरेच शॉट्स होते. मी एक डान्स स्टेप केला जो आलियाला खूप आवडला होता. तेव्हा ती म्हणाली होती की मी तुझ्या डान्सची फॅन झाले आहे. मी हे कॉम्प्लिमेंट म्हणून घेतलं. डान्स करताना माझा हाच प्रयत्न होता की स्टेप्सची पर्वा न करता जसं मला चांगलं वाटतं तसंच मी करेन. म्हणून सिनेमात माझे डान्स स्टेप्स एकदम नॅचरल वाटतात."

दुर्गेश कुमार 'हायवे' शिवाय इतरही काही सिनेमा आणि सीरिजमध्ये दिसला आहे. प्रत्येक भूमिकेत तो जीव ओतून काम करतो आणि ते खरं वाटेल असा प्रयत्न करतो. तो पुढे म्हणाला, "मी हायवे तील सीन्ससाठी जवळपास वीस दिवस अंघोळही केली नव्हती. इम्तियाज सर आणि मला हेच वाटत होतं की माझं कॅरेक्टर एकदम नॅचरल वाटावं."

दुर्गेश कुमार 'लापता लेडीज','भक्षक','डेढ बीघा जमीन' या सिनेमा आणि सीरिजमध्येही दिसला. आता लवकरच तो 'पंचायत ४' मध्ये दिसेल.

Web Title: Alia Bhatt is fan of Banrakas aka Durgesh Kumar from Panchayat webseries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.