Alia Bhatt : आलिया भटला आत्तापासूनच सतावू लागलीये लेकीची चिंता, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 04:50 PM2022-11-23T16:50:20+5:302022-11-23T16:50:48+5:30
Alia-Ranbir Daughter : सध्या आलिया आपल्या चिमुकलीच्या संगोपनात बिझी आहे. पण हो, हे करताना तिला आत्तापासूनच एक चिंता सतावू लागली आहे. एका मुलाखतीत तिने ही चिंता बोलून दाखवली.
Alia-Ranbir Daughter : बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) नुकतीच आई झाली. गेल्या 6 नोव्हेंबरला तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. सध्या आलिया आपल्या चिमुकलीच्या संगोपनात बिझी आहे. पण हो, हे करताना तिला आत्तापासूनच एक चिंता सतावू लागली आहे. एका मुलाखतीत तिने ही चिंता बोलून दाखवली.
Marie Clarie ला दिलेल्या मुलाखतीत आलिया लेकीबद्दल भरभरून बोलली. एक स्टारकिड म्हणून लेकीला वाढवणं किती जिकरीचं काम आहे, याची जाणीव आलियाला आहे आणि हेच तिच्या चिंतेचं कारण आहे.
काय म्हणाली आलिया?
‘मी माझ्या मुलीच्या पालनपोषणाबद्दल थोडी चिंतीत आहे. रणबीर (Ranbir Kapoor) , माझं कुटुंब आणि मित्रमैत्रिणींशी मी नेहमी याबद्दल बोलते. एक स्टारकिड असल्यामुळे लोकांच्या नजरा तिच्यावर आहेत. लोक तिला पाहू इच्छितात, तिच्याबद्दल जाणू इच्छितात. पण याचीच मला चिंता आहे. कारण माझ्या मुलीच्या आयुष्यात कोणी डोकावलेलं मला आवडणार नाही. शिवाय आलियाची मुलगी आहे म्हणून माझ्या मुलीला प्रसिद्धी मिळालेलीही आवडणार नाही,’ असं आलिया म्हणाली.
तिला अभिनेत्री बनवणार का?
तू व रणबीर दोघेही कलाकार आहात. तुमच्या मुलीनेही अभिनेत्री बनायचं ठरवलं तर? असा प्रश्न या मुलाखतीत आलियाला विचारला गेला. यावर ती म्हणाली, ‘ ती गोष्ट माझ्या हातात नाहीत, त्यामुळे मी याचा विचारही करत नाही. सेलिब्रिटी किंवा अभिनेत्री व्हायचं की नाही हा सर्वस्वी माझ्या मुलीचा निर्णय असेल. तिने काय करावं, कोणतं क्षेत्र निवडावं हे ती तिच्या मर्जीने ठरवू शकणार आहे. कारण, मी ठरवलेल्या गोष्टी पुढे तशा घडतीलच असं नाही. त्यामुळे निराशा येण्यापेक्षा मी या गोष्टींचा विचारच करत नाही.’
आलिया व रणबीरने अद्याप आपल्या मुलीचा चेहरा जगापासून लपवून ठेवला आहे. तिचं नावही अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. आलिया व रणबीरच्या चिमुकलीचा चेहरा पाहण्यास फॅन्स उत्सुक आहेत. पण या जोडप्यानं चाहत्यांना त्यांच्या खासगी आयुष्याचा आदर करण्याची विनंती केली आहे.