स्थिती नियंत्रणात आहे असे कसे म्हणू शकता? आलियाच्या आईचा मुख्यमंत्र्यांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 04:21 PM2020-07-16T16:21:45+5:302020-07-16T16:22:41+5:30
मुंबईत कोरोनाची स्थिती बिकट होत असताना आलिया भटची आई सोनी राजदान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही सवाल केले आहे.
मुंबईत कोरोनाची स्थिती बिकट होत असताना आलिया भटची आई सोनी राजदान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही सवाल केले आहे. आपल्या मैत्रिणीच्या आईचा कोरोना उपचारादरम्यानचा अनुभव सोनी यांनी शेअर केला आहे.
मुंबईत कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे, या बीएमसीचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या दाव्यावर सोनी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नागरिक इतके अडचणीत असताना स्थिती नियंत्रणात आहे असे तुम्ही म्हणूच कसे शकता? असा सवाल सोनी यांनी केला आहे.
All this is after pulling massive strings. For the hospitals as well as the drugs. How can you claim we are in control ? Don’t you know what citizens are going through ? @mybmc@uddhavthackeray@CMOMaharashtrahttps://t.co/ivMYoUyjja
— Soni Razdan (@Soni_Razdan) July 15, 2020
‘माझ्या मैत्रिणीच्या आईला रूग्णालयात बेड मिळत नव्हतो. बेड मिळण्याआधी गंभीर अवस्थेत त्यांना 7 रूग्णालये फिरावी लागली होती. रूग्णालये सरकारी दरापेक्षा दुप्पट पैसे वसूल करत आहेत. प्रत्येक नागरिकाला बेड आणि औषधे मिळेपर्यंत स्थिती नियंत्रणात आहे, असे कृपा करू आम्हाला सांगू नका,’ असे ट्वीट सोनी यांनी केले आहे.
Friend’s mother could not get a bed just now. Had to go to 7 hospitals while in critical state bef finding one. Remdesivir not available. Then at double the Govt rate. Till every citizen gets a bed and drugs easily please don’t tell us we’re in control ! https://t.co/17Mmb1uDC8
— Soni Razdan (@Soni_Razdan) July 15, 2020
अन्य एका ट्वीटमध्ये त्यांनी बीएमसीसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘अनेक स्तरावर प्रयत्न करूनही ही स्थिती आहे. रूग्णालयांसोबतच औषधांसाठीही भटकावे लागतेय. अशात स्थिती नियंत्रणात आहेत, असे तुम्ही कसे म्हणू शकता? नागरिक कुठल्या स्थितीतून जात आहेत, हे तुम्हाला ठाऊक नाही का? ही एक महामारी आहे, रोजचे युद्ध आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. पण प्रत्यक्षात गोष्टी चांगल्या होईपर्यंत तरी कृपया दावे करू नका,’ असे ट्वीट सोनी यांनी केले. यात त्यांनी मुख्यमंत्र्यांना टॅग केले आहे.