आलिया भटनेसुद्धा पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिला मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 06:46 PM2020-04-01T18:46:50+5:302020-04-01T18:59:19+5:30
आलियाने पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला मदत केली आहे.
देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आता देशात एकूण कोरोना बाधितांची संख्या 1637 वर पोहोचली आहे.. आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात परिस्थिती अतिशय भयाण असून अनेकजण आपापल्यापरिने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींन पीएम केअर फंडला डोनेशन दिले आहे. आता या लिस्टमध्ये आणखी एक नाव सामिल झाले आहे ते आलिया भटचे. आलियाने पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला मदत केली आहे. तिनेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट माहिती दिली आहे.
🙏 #StayHomeStaySafeSaveLivespic.twitter.com/lTl8MoSYNM
— Alia Bhatt (@aliaa08) March 31, 2020
आलियाने ट्विट केले आहे की, 'या कठीण परिस्थितीत जिथे आपला देश एकीकडे लॉकडाऊन आहे, कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मी त्यांच्या धौर्याला आणि कामाला सलाम करते ज्यांनी या कठीण परिस्थितीत इतरांच्या सुरक्षिततेसाठी स्वत: च्या जीवाचा धोका पत्करला आहे. मी पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला माझे योगदान देते.
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी मदत करण्यासाठी पुढे आले असून वरुण धवन, भुषण कुमार, राजकुमार राव, कपिल शर्मा, वरुण धवन, शिल्पा शेट्टी यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीत काही लाखांची मदत केली आहे. अभिनेता अक्षय कुमारने तर 25 कोटींची मदत केली आहे.