घरात राहून ‘फॅमिली’ शॉर्टफिल्म तयार झाली, पण कुणी शूट केली रे भाऊ?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 01:30 PM2020-04-12T13:30:00+5:302020-04-12T13:30:02+5:30
‘फॅमिली’च्या जन्माची कथा...
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाबाधितांचा आकडा चिंता वाढवणारा आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जनजीवन ठप्प पडले आहे. लोक घरात कैद आहेत. अशात देशातील प्रत्येकजण आपआपल्या परीने कोरोनाशी लढतोय. आपले सेलिब्रिटी वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करत आहेत. नुकतीच बॉलिवूडच्या काही दिग्गजांनी लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करून आपआपल्या घरात राहून ‘फॅमिली’ नावाची शॉर्टफिल्म साकारली होती. ही शॉर्ट फिल्म तुम्ही पाहिली असेलच. अशात ही शॉर्ट फिल्म पाहिलेल्या अनेकांना एक प्रश्न पडला होता. तो म्हणजे, ही शॉर्टफिल्म घरात शूट झाली ते ठीक, पण ती शूट केली कुणी? तर आता त्याचाही खुलासा झाला आहे.
T 3493 - When you see that the cause is greater than the idea you dreamt of .. there is just immense joy and gratitude for all my colleagues and friends in the making of this historic effort !
— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 6, 2020
WE ARE ONE and WE SHALL OVERCOME ! Jai Hind ! https://t.co/WoquwkSyqT
होय, या शॉर्ट फिल्ममध्ये अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट, प्रियंका चोप्रा, रजनीकांत, मामुटी, मोहनलाल, चिरंजीवी, दिलजीत दोसांज, सोनाली कुलकणी असे सगळे स्टार्स दिसले होते. या सगळ्यांनी आपआपल्या घरात राहून या सगळ्यांनी शूट केले होते. आता हे शूटींग घेणारा कोण होते तर या स्टार्सच्याच घरातील सदस्य.
होय, लॉकडाउन असल्यामुळे सध्या आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एकत्र राहत आहेत. त्यामुळे या दोघांनीही एकमेकांचे चित्रीकरण केले. प्रियंका चोप्रासाठी तिचा गायक नवरा निक जोनास व्हिडीओग्राफर झाला.
बिग बी यांच्यासाठी अभिषेक व्हिडीओग्राफर बनला. रजनीकांत यांचा व्हिडीओ त्यांची लेक सौंदर्याने शूट केला.
या शॉर्टफिल्मची संपूर्ण संकल्पना ही प्रसून पांडे यांची होती. त्यांच्याच कल्पनेतून ही शॉर्ट फिल्म तयार झाली. कसे व्हिडीओ हवेत, हे सांगण्यासाठी प्रसून यांनी सर्व कलाकारांना उदाहरण म्हणून एक व्हिडीओ पाठवला होता. तो पाहून सर्व कलाकारांनी स्वत:साठी एक फ्रेम निवडली आणि मग आपआपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने व्हिडीओ शूट करून प्रसून यांना पाठवले. त्यानंतर हे व्हिडीओ एकत्रित एडिट करून शॉर्टफिल्म तयार झाली.