ऐश्वर्या, प्रियंका पाठोपाठ बॉलिवूडची ही अभिनेत्रीदेखील चालली हॉलिवूडला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 01:38 PM2019-11-06T13:38:34+5:302019-11-06T13:43:58+5:30
गेल्या काही दिवसांपासून बी-टाऊनमध्ये तिच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे
‘स्टुडंट ऑफ द इयर २’ चित्रपटातून दिग्दर्शक करण जोहरने अभिनेत्री आलिया भट्ट हिला लाँच केले. तिच्या टॅलेंट आणि अभिनयाच्या जोरावर तिने विविध चित्रपट केले. या सर्व चित्रपटांमध्ये तिने वेगवेगळया भूमिका साकारल्या. ‘हायवे’,‘कपूर अॅण्ड सन्स’,‘कलंक’ यासारख्या अनेक चित्रपटातून तिने तिचे कौशल्य सिद्ध केले. राजस्थान पत्रिकाच्या माहितीनुसार आलियाला हॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा आहे. यासाठी तिने तयारीसुद्धा सुरु केली आहे.
काही दिवसांपूर्वीच आलियाला तिची बेस्टफ्रेंड आकांशा रंजन कपूरसोबत लॉस एंजेलिसमध्ये पाहण्यात आले. फॅन्सना वाटेल आलिया तिकडे व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेली आहे. मात्र रिपोर्टनुसार आलिया इंटरनॅशनल सेलिब्रेटी एजेंटच्या शोधात तिकडे गेली होती. याआधी ऐश्वर्या राय, बिपाशा बासूने आणि प्रियंका चोप्रानेसुद्धा एजेंट नियुक्त केले आहेत. एजेंट्स त्यांना हॉलिवूडमध्ये होत असलेल्या इव्हेंट आणि सिनेमांबाबत माहिती देतात.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, आलियाने नुकतीच 'सडक 2' चे शूटिंग केले आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस ती संजय लीला भन्साळी यांच्या गंगुबाई काठियावाडी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.
काही दिवसांपासून आलिया-रणबीरच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी दोघांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाले होती. मीडिया रिपोर्टनुसार दोघे फ्रांसमध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. यात किती तथ्य आहे हे आपल्या लवकरच कळेल.