RRR च्या प्रमोशनसाठी तब्बल ७२ हजारांची साडी; जाणून घ्या आलियाच्या साडीचं वैशिष्ट्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 07:15 PM2022-03-24T19:15:00+5:302022-03-24T19:15:02+5:30

Alia bhatt: प्रसिद्ध सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी आलियाचीही साडी डिझाइन केली होती.

alia bhatt wore sabyasachi mukherjee designer organza saree for the promotion of rrr movie | RRR च्या प्रमोशनसाठी तब्बल ७२ हजारांची साडी; जाणून घ्या आलियाच्या साडीचं वैशिष्ट्य

RRR च्या प्रमोशनसाठी तब्बल ७२ हजारांची साडी; जाणून घ्या आलियाच्या साडीचं वैशिष्ट्य

googlenewsNext

बॉलिवूड कलाकार अनेकदा त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइल आणि महागडा वस्तूंमुळे चर्चेत येत असतात. यात खासकरुन काही अभिनेत्री त्यांच्या डिझायनर ड्रेस आणि त्याच्या किंमतीमुळे चर्चेत येतात. सध्याच्या घडीला अभिनेत्री आलिया भट्ट हिची चर्चा रंगली आहे. 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटानंतर आलिया 'RRR' या चित्रपटात झळकणार आहे. त्यामुळे सध्या आलिया या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. मात्र, या प्रमोशन इव्हेंटमधील तिचं ड्रेसिंग सेन्स अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. यामध्येच एका कार्यक्रमात तिने प्रचंड महाग साडी परिधान केल्याचं पाहायला मिळालं. ही साडी काही कारणास्तव खास असल्यामुळे तिची किंमतही तितकीच असल्याचं सांगण्यात येतं.

अलिकडेच 'RRR' च्या प्रमोशनसाठी आलियाने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिने नारंगी रंगाची ऑर्गेंजा ही सिंपल साडी नेसली होती. मात्र, साधी वाटणारी तिचीही साडी तब्बल ७२ हजारांची असल्याचं सांगण्यात येतं. ही साडी खास आलियासाठी तयार करण्यात आली होती. 

प्रसिद्ध सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी आलियाचीही साडी डिझाइन केली होती. या साडीवर हलकी फ्लॉवर प्रिंट होती. तसंच त्यावर आलियाने ऑलिव्ह ग्रीन रंगाचा स्क्विन स्ट्रॅप ब्लाऊज परिधान केलं होतं. सोबतच तिने सब्यसाचीच्या कलेक्शनमधील झुमके घातले होते. या लूकमध्ये आलिया कमालीची सुंदर आणि छान दिसत होती. 

दरम्यान, सब्यसाची यांच्या कलेक्शनमधील ही खास साडी असल्यामुळे त्याची किंमत ७० ते ७२ लाख रुपये असल्याचं सांगण्यात येतं. आलियाचा गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला. त्यानंतर तिचा 'RRR' हा चित्रपट येत्या २५ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.
 

Web Title: alia bhatt wore sabyasachi mukherjee designer organza saree for the promotion of rrr movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.