थाटामाटात पार पडणार आलिया भटचं डोहाळं जेवण, सासूबाई आणि आई मिळून करतायेत अशी तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 06:38 PM2022-09-14T18:38:08+5:302022-09-14T18:38:43+5:30

Alia Bhatt And Ranbir Kapoor: आलिया भट आणि रणबीर कपूर सध्या त्यांच्या 'ब्रह्मास्त्र पार्ट वन शिवा' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत.

Alia Bhatt's baby shower will be hosted by mother-in-law and mother | थाटामाटात पार पडणार आलिया भटचं डोहाळं जेवण, सासूबाई आणि आई मिळून करतायेत अशी तयारी

थाटामाटात पार पडणार आलिया भटचं डोहाळं जेवण, सासूबाई आणि आई मिळून करतायेत अशी तयारी

googlenewsNext

आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्यांच्या 'ब्रह्मास्त्र पार्ट वन शिवा' (Brahmastra) या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसलेल्या रणबीर आणि आलियाच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून पाच दिवसांत १५० कोटींचा टप्पा पार केला आहे. त्याच वेळी, रणबीर आणि आलिया देखील लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत, ज्याबद्दल ते खूप उत्सुक आहेत. या सगळ्यामध्ये नीतू कपूर आणि सोनी राजदान यांनी आलियाच्या बेबी शॉवरची तयारी सुरू केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया भटची आई सोनी राजदान आणि सासू नीतू कपूर या आलियासाठी काही खास प्लानिंग करत आहेत. दोघांनीही आलियाच्या बेबी शॉवरची तयारी सुरू केली आहे, ज्यामध्ये फक्त मुलीच असतील. बेबी शॉवर फक्त मुंबईतच होणार आहे. मात्र, बेबी शॉवर समारंभ लग्नाप्रमाणे घरी होणार की अन्य ठिकाणी होणार हे निश्चित झालेले नाही. या महिन्याच्या अखेरीस आलियाच्या बेबी शॉवरची बातमी समोर येत आहे.


रिपोर्ट्सनुसार, आलिया भटच्या बेबी शॉवरमध्ये फार कमी लोक सहभागी होणार आहेत. यामध्ये फक्त आलियाच्या बालपणीचे मैत्रिणी आणि कुटुंबीयांचा समावेश असेल. पाहुण्यांच्या यादीत आकांक्षा रंजन सिंग, शाहीन भट्ट, करीना कपूर, नव्या नंदा, श्वेता बच्चन, आरती शेट्टी आणि जवळच्या फ्रेंड्सचा समावेश आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर आलिया भट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. त्याचबरोबर ती 'हार्ट ऑफ स्टोन'मधून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 

Web Title: Alia Bhatt's baby shower will be hosted by mother-in-law and mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.