आलियाने घेतला युटर्न, एक्स बॉयफ्रेडविषयी पहिल्यांदा शेअर केल्या 'या' गोष्टी !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 06:00 AM2019-02-18T06:00:00+5:302019-02-18T06:00:00+5:30

भूतकाळाविषयची कटुता मनातून काढून टाकली तर दोघांना मित्र या नात्यानं एकत्र यायला काहीच हरकत नाही असंही आलियाने पुढे सांगितले.

Alia took the first time, shared these things about X Boyfriend! | आलियाने घेतला युटर्न, एक्स बॉयफ्रेडविषयी पहिल्यांदा शेअर केल्या 'या' गोष्टी !

आलियाने घेतला युटर्न, एक्स बॉयफ्रेडविषयी पहिल्यांदा शेअर केल्या 'या' गोष्टी !

googlenewsNext

ते आले जवळ आणि पुन्हा दूर गेले.. त्यांच्या रोमान्सची जितकी चर्चा झाली.. तितकी ब्रेकअपचीही... दोघांची जोडी रसिकांनी डोक्यावर घेतली. ही जोडी म्हणजे आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा.सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन आणि आलिया भट्ट त्रिकुटाने 'स्टुडन्ट ऑफ द इयर' या पहिल्याच सिनेमातील आपल्या दमदार अभिनयाने  रसिकांची मने जिंकली. पहिल्या सिनेमात आलिया आणि सिद्धार्थ दोघांत वेगळीच केमिस्ट्री पाहायला मिळाली. तेव्हापासूनच आलिया आणि सिद्धार्थ यांच्यातील प्रेमाचं नातं बहरत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र नंतर बी- टाऊनमध्ये आलिया आणि सिद्धार्थ यांच्यात काही तरी बिनसले आणि या लव्ह बर्ड्समध्ये दुरावा निर्माण झाला. दोघांचं ब्रेकअप झाले त्यामुळे ते फारसे एकत्र पाहायला मिळाले नाहीत. 

आता आलिया रणबीर कपूरला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर आलिया आणि रणबीर यांच्याकडून त्यांच्या प्रेमाचा खुलासा झाला नसला तरीही चुपके चुपके यांच्यात प्रेमाचे नातं फुलले असल्याचे बोलले जाते. एकीकडे रणबीर आलियाच्या प्रेमाचे गोडवे गात असताना दुसरीकडे आलिया मात्र एक्सबॉयफ्रेंड सिद्धार्थला विसरू शकत नसल्याचे समोर आले आहे. आलिया आणि सिद्धार्थ दोघांच्या वाटा वेगळ्या असल्या तरी सिद्धार्थविषयी मला खूप आदर आहे असं आलियाने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे. भूतकाळाविषयची कटुता मनातून काढून टाकली तर दोघांना मित्र या नात्यानं एकत्र यायला काहीच हरकत नाही असंही आलियाने पुढे सांगितले. एकंदरितच आलिया- सिद्धार्थचं नातं अजूनही क्लोज असल्याचं स्पष्ट होते. 

Also Read: रणबीर कपूरसोबत काम करताना आलिया भट्टला पडतो जगाचा विसर...!!

‘मी माझ्या आयुष्यात रणबीर कपूर इतका चांगला अभिनेता पाहिला नाही. त्याच्यासोबत काम केल्यानंतर तो किती उत्तम कलाकार आहे, हे मला कळले.   जेव्हा केव्हा मी त्याला अभिनय करताना पाहायचे,  नुसते पाहतचं राहायचे. त्याच्यासोबत परफॉर्म करताना मी अनेकदा माझे संवाद विसरायचे. तो समोर आला की, सगळे काही विसरायला होते,’ असे आलिया म्हणाली.

Web Title: Alia took the first time, shared these things about X Boyfriend!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.