अलका कुबल आणि प्रिया बेर्डेंना न्यायालयाचा दणका, भरावा लागणार तब्बल १० लाखांचा दंड!, जाणून घ्या काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 12:59 PM2022-09-24T12:59:30+5:302022-09-24T13:00:27+5:30

गेल्या १० वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्याचा आज निकाल लागला आहे. न्यायालयाने अलका कुबल, प्रिया बेर्डे यांच्यासह आणखी १५ जणांना सहा आठवड्यात १० लाखांहून जास्त रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत.

Alka Kubal and Priya Berde hit by court, fine of 10 lakhs to be paid!, know what is the case | अलका कुबल आणि प्रिया बेर्डेंना न्यायालयाचा दणका, भरावा लागणार तब्बल १० लाखांचा दंड!, जाणून घ्या काय आहे प्रकरण

अलका कुबल आणि प्रिया बेर्डेंना न्यायालयाचा दणका, भरावा लागणार तब्बल १० लाखांचा दंड!, जाणून घ्या काय आहे प्रकरण

googlenewsNext

पुण्यात महामंडळाच्यावतीने केलेल्या मानाचा मुजरा या सांस्कृतिक कार्यक्रमात अनावश्यक आणि बोगस खर्च केल्यामुळे त्यांचे ११ लाख रुपये सहा आठवड्यात न्यायायलयात भरावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या आजी व माजी पदाधिकारी, संचालकांना दिला आहे. यात माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे, विजय पाटकर, अलका कुबल, प्रिया बेर्डे यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे.

पुण्यात २०१२-१३ दरम्यान मानाचा मुजरा हा कार्यक्रम पार पडला होता. त्यावेळी या कार्यक्रमासाठी तत्कालीन संचालकांनी ५२ लाख रुपये खर्च केले होते. सर्वसाधारण सभेत या खर्चाला मान्यता मागितली होती. त्यावेळी सभासदांनी आक्षेप घेतला होता. जे खर्च चुकीच्या पद्धतीने झाले आहेत, त्याची वसुली झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली होती.

चित्रपट महामंडळाच्यावतीनं १० वर्षांपूर्वी पुण्यात मानाचा मुजरा हा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यावेळी तत्कालिन संचालकांनी बोगस खर्च दाखवून रक्कम लाटल्याचा आरोप सभासदांनी केला होता. त्यानुसार धर्मादाय आयुक्तांनी १० लाख ७८ हजार रुपये तातडीने भरण्याचा आदेश दिला. पण याला संबंधित संचालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पण त्यांची याचिका फेटाळून लावत ती रक्कम सहा आठवड्यात भरण्याचा आदेश देण्यात आला आहे. दरम्यान, ही रक्कम भरण्यास टाळाटाळ केल्यामुळे महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी अनेक संचालकांचे सभासदत्व रद्द केले आहे.

ज्यांच्याकडून ही रक्कम भरून घ्यावी असा आदेश दिलेल्यामध्ये माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे, विजय कोंडके, विजय पाटकर, मिलींद अष्टेकर, सतीश बिडकर, सुभाष भुरके, अलका कुबल, प्रिया बेर्डे, अनिल निकम, संजीव नाईक, सतीश रणदिवे, इम्तियाज बारगीर, सदानंद सूर्यवंशी, बाळकृष्ण बारामती व व्यवस्थापक रवींद्र बोरगांवकर यांचा समावेश आहे.

Web Title: Alka Kubal and Priya Berde hit by court, fine of 10 lakhs to be paid!, know what is the case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.