अलका कुबल यांचे पतीही आहे सिनेक्षेत्राशी संबधीत जाणून घ्या Unknow Facts

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 09:00 AM2021-09-18T09:00:00+5:302021-09-18T09:00:00+5:30

मराठीतील ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'माहेरची साडी' या सिनेमाला प्रदर्शित होवून बरेच वर्ष झाले असले तरी सिनेमाची जादू आजही रसिकांच्या मनात कायम आहे.

Alka Kubals Husband Sameer Athalye is also a well known person in cine industry, check what he does | अलका कुबल यांचे पतीही आहे सिनेक्षेत्राशी संबधीत जाणून घ्या Unknow Facts

अलका कुबल यांचे पतीही आहे सिनेक्षेत्राशी संबधीत जाणून घ्या Unknow Facts

googlenewsNext

सून, लेक अशा व्यक्तीरेखा साकारणाऱ्या  अभिनेत्री अलका कुबल यांनी रसिकांना कधी हसवलं तर कधी टचकन डोळ्यात पाणी आणलं.माहेरच्या साडी हा सिनेमात तर इतका गाजला की घराघरात अलका कुबल यांनी प्रसिद्धी मिळाली. शहरातच नाही तर खेड्यापाड्यात त्यांचा चाहता वर्ग निर्माण झाला.गावात गावात हा सिनेमा पोहचला होता. या सिनेमाने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.

मराठीतील ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'माहेरची साडी' या सिनेमाला प्रदर्शित होवून बरेच वर्ष झाले असले तरी सिनेमाची जादू आजही रसिकांच्या मनात कायम आहे.सिनेमाची कथा आणि कलाकारांच्या दमदार अभिनयाने या सिनेमाने रसिकांची प्रचंड पसंती मिळवली होती. विजय कोंडके यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. सिनेमात मुख्य भूमिका साकारेल्या अभिनेत्री अलका कुबल यांचा अभिनय पाहून रसिकांच्याही डोळ्यात अश्रु तरळायचे. 

अलका कुबल या सिनेमामुळे रसिकांची आवडती अभिनेत्री बनल्या होत्या. अलका कुबल हे नाव महाराष्ट्रातील घराघरांत जाऊन पोहोचले.आजही अलका कुबल यांचे नाव काढताच माहेरची साडी रसिकांना नाही आठवला तर नवलच. त्यांच्या फिल्मी करिअर प्रमाणे खासगी आयुष्याविषयीही जाणून घेण्यात चाहत्यांना रस असतो. अलका कुबल यांनी समीर आठल्ये यांच्याशी लग्न करत संसार थाटला. 

दोघांचे लव्हमॅरेज आहे. समीर आठल्ये देखील सिनेक्षेत्राशी सबंधीत आहेत. सिनेमॅटोग्राफर म्हणून त्यांनीही इंडस्ट्रीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. एका सिनेमाच्या निमित्ताने समीर आणि अलका यांची ओळख झाली होती. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. सुरुवातील अलका यांच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता.अलका यांच्या आग्रहाखातर घरच्यांनीही लग्नाला होकार दिला.

 अलका आणि समीर यांनी दोन मुली आहेत. ईशानी हे त्यांच्या थोरल्या मुलीचे तर कस्तुरी धाकट्या मुलीचे नाव आहे.   ईशानी आठल्येने अभिनय क्षेत्रात न येता वेगळ्याच क्षेत्रात करिअर करायचे ठरवले होते.  लहानपणापासूनच तिला विमानाची आवड होती. याच आवडीतून तिने वैमानिकाचे शिक्षण घेतले आणि आज ती कमर्शिअल पायलट म्हणून काम करते. 

कस्तुरी आणि ईशानी दोन्ही सौंदर्याच्या बाबतीत आजच्या आघडीच्या अभिनेत्रींनाही टक्कर देतात. आईप्रमाणेच त्या दिसायला सुंदरआ हेत. सोशल मीडियावर अलका कुबल यांच्यासह त्यांचे फोटो व्हायरल होत असतात. त्यांच्या या फोटोंवर चाहतेही लाईक्स आणि कमेट्स देत पसंती देत असतात. 

Web Title: Alka Kubals Husband Sameer Athalye is also a well known person in cine industry, check what he does

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.