सोनम कपूर आणि मलायका अरोरामध्ये झाली भांडणं?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 09:00 PM2019-03-06T21:00:00+5:302019-03-06T21:00:03+5:30
अर्जुनची चुलत बहीण सोनम कपूर आणि मलायका अरोरा यांच्यात सगळे काही आलबेल नसल्याचे म्हटले जात आहे.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यात प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियात सुरू आहे. ते दोघे अनेक सार्वजनिक ठिकाणी एकमेकांसोबत वेळ घालवताना देखील दिसतात. पण त्या दोघांनीही त्यांच्या नात्यावर मौन राखणेच पसंत केले आहे. लवकरच हे कपल लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचे देखील म्हटले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, अर्जुनची चुलत बहीण सोनम कपूर आणि मलायका अरोरा यांच्यात सगळे काही आलबेल नसल्याचे म्हटले जात आहे.
टाइम्स नाऊ या वाहिनीने नुकत्याच दिलेल्या बातमीनुसार मलायका अरोरा एका पार्टीत गेली होती. या पार्टीत तिने मोठ्या प्रमाणावर मद्यपान केले असल्याने तिला स्वतःला सांभाळणे कठीण जात होते. त्यावेळी सोनम तिला मदत करण्यासाठी गेली. पण सोनमची मदत घेण्याऐवजी तू दूर राहा असे ती सोनमला सगळ्यांच्या समोर बोलली. मलायका कोणाचेच ऐकायला तयार नव्हती. ती स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकते असे सोनमला म्हणाली आणि हीच गोष्ट सोनमला आवडली नसल्याचे म्हटले जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अर्जुन आणि मलायका यांनी लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये एक अलिशान फ्लॅट खरेदी केल्याची चर्चा आहे. लग्नानंतर मलायका आणि अर्जुन या फ्लॅटमध्ये शिफ्ट होतील, असे म्हटले जात आहेत. तसेच एप्रिल महिन्यात ते दोघे ख्रिश्चन रितीरिवाजाप्रमाणे लग्न करणार असल्याची देखील चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वीच करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये मलायकाने अर्जुनबद्दलच्या तिच्या प्रेमाची अप्रत्यक्षपणे कबुली दिली होती. तर या आधी अर्जुन कपूरनेदेखील याच चॅट शोमध्ये अप्रत्यक्षपणे लग्नाचे संकेत दिले होते. शोचा होस्ट करण जोहरने अर्जुनला त्याच्या रिलेशनशिप स्टेट्सविषयी प्रश्न विचारला असता मी सिंगल नाहीये, असे अर्जुन म्हणाला होता. अर्जुनच्या या उत्तराने त्याची बहीण जान्हवी कपूरलादेखील आश्चयार्चा धक्का बसला होता.
आशुतोष गोवारीकरच्या पानीपतमध्ये अर्जुन कपूर काम करत असून या ऐतिहासिक सिनेमात तो मुख्य भूमिकेत आहे. ‘पानीपत’मध्ये अर्जुन कपूर मराठा योद्धा सदाशिवराव भाऊ पेशवे यांची भूमिका साकारणार आहे.