“अल्लादिन – नाम तो सुना होगा’’ मालिकेतील कलाकरांची नाव जाहिर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 10:51 AM2018-05-17T10:51:53+5:302018-05-17T16:21:53+5:30
विनोदाचा समानार्थी शब्द आहे सोनी सब... या वाहिनीच्या आगळ्यावेगळ्या संहितेमुळे ही समानता सार्थ ठरते. अरेबियन नाईट्समधील लोककथेतला अल्लादिन आता ...
व नोदाचा समानार्थी शब्द आहे सोनी सब... या वाहिनीच्या आगळ्यावेगळ्या संहितेमुळे ही समानता सार्थ ठरते. अरेबियन नाईट्समधील लोककथेतला अल्लादिन आता या वाहिनीच्या माध्यमातून पुन्हा आपल्यासमोर येणार आहे. जादूई दुनियेत घेऊन जाणाऱ्या अल्लादिन – नाम तो सुना ही होगा या मालिकेत हलकाफुलका विनोद, साहस, रोमांच आणि नाट्य या सर्वच रसांचा सुंदर मिलाफ आहे. निसार परवेझ आणि अलिंद श्रीवास्तव यांच्या पेनिन्सुला पिक्चर्स निर्मिती संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे.
अल्लादिनची महत्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी सिद्धार्थ निगम याची नियुक्ती करण्यात आली असून हा धाडसी प्रवास करण्यासाठी तो व त्याचे कुटुंब सज्ज झाले आहे. एक प्रेमळ पण दुष्ट, एक रोमँटिक कवी आणि एक प्रामाणिक चोर या शब्दांतच आपण त्याचे वर्णन करू शकतो. आपल्या दुर्दैवी प्रवासादरम्यान, अल्लादिनला अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो आणि या दरम्यान त्याची भिन्न स्वभावाच्या अनेक माणसांची ओळख होते. अशाच एका प्रसंगी सुंदर राजकुमारी यास्मीन त्याच्यासमोर येते. यास्मीनची भूमिका अवनीत कौर हिने उत्कृष्ट वठवली आहे. त्याच्या प्रवासादरम्यान त्याला “चिराग’’ही सापडतो. या जादूई दिव्यात गूढरम्य असा जिनी दडलेला आहे. जिनीची ही भूमिका राशूल टंडन याने निभावली आहे. या मालिकेतील संहितेशिवाय, मालिकेतील तगड्या कलाकारांमुळेही प्रेक्षकांना अद्वितीय आनंद मिळणार आहे. अल्लादिनच्या अम्मीच्या भूमिकेत अनिता कुलकर्णी यांना घेण्यात आले असून चाचा म्हणून बद्रूल इस्लाम, चाचीच्या भूमिकेत गुल्फाम खान, सुलतानाच्या भूमिकेत प्रित कौर, सुलतान म्हणून मुनी झा, झाफर या दुष्ट वजिराच्या पात्रात चंदन आनंद आणि ओमरच्या भूमिकेत झैद खान या कलाकारांना आपण पाहणार आहोत.