'पुष्पा'साठी Allu Arjun ला मिळालं इतकं मानधन, इतर कलाकारांच्या फीचा आकडा कोट्यावधीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 02:25 PM2022-01-04T14:25:30+5:302022-01-04T14:25:56+5:30

अल्लू अर्जुन (Allu Arjun)च्या 'पुष्पा' (Pushpa Movie) चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे.

Allu Arjun gets so much honorarium for 'Pushpa', other artists' fees are in crores | 'पुष्पा'साठी Allu Arjun ला मिळालं इतकं मानधन, इतर कलाकारांच्या फीचा आकडा कोट्यावधीत

'पुष्पा'साठी Allu Arjun ला मिळालं इतकं मानधन, इतर कलाकारांच्या फीचा आकडा कोट्यावधीत

googlenewsNext

साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जून (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मीका मंदाना (Rashmika Mandana)चा पुष्पा (Pushpa Movie) हा चित्रपट नुकताच रिलीज झाला. या चित्रपटाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. इतकेच नाही तर सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने आतापर्यंत ३०० कोटींहून जास्त कमाई केली आहे. प्रेक्षकांना पुष्पा चित्रपटासाठी कलाकारांना किती मानधन देण्यात आलं असेल, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

अल्लू अर्जुन (Allu Arjun)
'पुष्पा: द राइज' चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुनने पुष्पा राज नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अल्लू अर्जुनला या चित्रपटासाठी ५० कोटींची ऑफर देण्यात आली होती.

रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna)
'पुष्पा: द राइज' या चित्रपटात रश्मिका मंदानाने श्रीवल्लीची भूमिका साकारली आहे. रिपोर्टनुसार, रश्मिकाला या चित्रपटासाठी ८ ते १० कोटींची ऑफर देण्यात आली होती.


समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu)
अभिनेत्री समंथा रुथ प्रभू 'पुष्पा: द राइज' या चित्रपटातील 'ओ अंतवा ऊओ ऊ' आयटम साँग करताना दिसली. फक्त या गाण्यासाठी समंथाला दीड कोटी ते २ कोटींची ऑफर देण्यात आली.

फहद फासिल (Fahadh Faasil )
अभिनेता फहद फासिलने या चित्रपटात आयपीएस अधिकारी भंवर सिंग शेखावत याची भूमिका निभावली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फहादला या चित्रपटासाठी ३-४ कोटी रुपये मिळाले आहेत.

सुनील (Sunil)
'पुष्पा: द राइज' या चित्रपटात अभिनेता सुनीलने मंगलम श्रीनूची भूमिका केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुनीलला या भूमिकेसाठी १ ते दीड कोटी रुपये मिळाले आहे.

Web Title: Allu Arjun gets so much honorarium for 'Pushpa', other artists' fees are in crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.