Pushpa साठी अल्लू अर्जुनने केली २ वर्ष अंगमेहनत; पण आता 'या' दुखण्याने आहे त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 04:09 PM2022-01-24T16:09:23+5:302022-01-24T16:13:18+5:30
Allu arjun: या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनने तब्बल २ वर्ष मेहनत घेतली आहे. परंतु, आता त्याला एक नवीन शारीरिक व्याधी मागे लागल्याचं सांगण्यात येत आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) स्टारर 'पुष्पा' (Pushpa: the Rise) हा चित्रपट अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या करिअरमधील महत्त्वाचा चित्रपट ठरला आहे. हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम अशा विविध भाषांमध्ये प्रदर्शित झालेला पुष्पा बॉक्स ऑफिसवर तुफान घोडदौड करत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनने तब्बल २ वर्ष मेहनत घेतली आहे. परंतु, आता त्याला एक नवीन शारीरिक व्याधी मागे लागल्याचं सांगण्यात येत आहे. एका मुलाखतीत अभिनेत्याने स्वत: याविषयी खुलासा केला आहे.
'पुष्पा' या चित्रपटात अल्लू अर्जुनने पुष्पाराज ही भूमिका साकारली आहे. परंतु, हे कॅरेक्टर कायमस्वरुपी प्रेक्षकांच्या लक्षात रहावं यासाठी चित्रपटाची क्रिएटिव्ह टीम काम करत होती.यात या टीमने अनेक आयडिया काढल्यानंतर पुष्पाचा एक खांदा वर असावा असा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे संपूर्ण चित्रपटात एक खांदावर करुन चालणं किंवा डन्स करणं वाटतं तितकं सोपं नव्हतं. त्यासाठी अल्लू अर्जुनने २ वर्ष मेहनत घेतली. परंतु, आता हा खांदा वर करुन चालणं त्याच्या अंगाशी आलं आहे. सध्या अल्लू अर्जुन खांदेदुखीने त्रस्त आहे.
'पुष्पा'फेम दक्षायणी खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पाहा तिचा रिअल लाइफ रावडी लूक
"पुष्पाच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी मी २ वर्ष मेहनत घेतली. पण, आता तो खांदा प्रचंड दुखतोय. यात खांद्याला दुखापतही झाली आहे. अजुनही हा खांदेदुखीचा त्रास मला होतोय", असं अल्लू अर्जुनने एका मुलाखतीत सांगितलं.
दरम्यान, अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेला पुष्पा १७ डिसेंबर २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातने आतापर्यंत ३०० कोटींची कमाई केली असून एकट्या हिंदी व्हर्जनने ५६ कोटींची कमाई केल्याचं सांगण्यात येतं.