अल्लू अर्जुन की ज्युनिअर एनटीआर? साउथमधील कोणता अभिनेता घेतो तगडं मानधन, पाहा ही लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 07:34 PM2024-09-28T19:34:13+5:302024-09-28T19:44:48+5:30

साउथ कलाकारांचे फॅन फॉलोअर्स केवळ दक्षिणेतच नाही तर संपूर्ण देशात आहेत, लोकांना त्यांचे चित्रपट खूप आवडतात. या आवडत्या अभिनेत्यांपैकी कोण किती मानधन घेतात ते जाणून घेऊयात.

साउथ कलाकारांचे फॅन फॉलोअर्स केवळ दक्षिणेतच नाही तर संपूर्ण देशात आहेत, लोकांना त्यांचे चित्रपट खूप आवडतात. या आवडत्या अभिनेत्यांपैकी कोण किती मानधन घेतात ते जाणून घेऊयात.

सुपरस्टार रजनीकांत हे साउथ चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते आहेत. त्यांची फी सुमारे १०० कोटी रुपये आहे परंतु प्रोजेक्टच्या प्रॉफिटवर अवलंबून आहे. रिपोर्ट्सनुसार, रजनीकांत यांनी कोणत्याही चित्रपटात काम केले तर त्याचा १५ ते २५ टक्के नफा होतो.

डीएनएनुसार, साउथचा लोकप्रिय अभिनेता चिरंजीवी एका चित्रपटासाठी ५० ते ७० कोटी रुपये मानधन घेतो. तर त्यांचा मुलगा राम चरण ८० ते १०० कोटी रुपये फी घेतो.

विजय देवरकोंडा हा तेलुगू चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहेत परंतु त्याने तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. डीएनए रिपोर्टनुसार एका चित्रपटासाठी २५ ते ३० कोटी रुपये मानधन घेतो.

थलपथी विजय दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रिपोर्ट्सनुसार, विजय चित्रपटाच्या बजेटनुसार फी घेतो. तरीही तो कोणत्याही चित्रपटासाठी १०० कोटींपेक्षा कमी पैसे घेत नाही.

साऊथ सुपरस्टारच्या 'केजीएफ'च्या दोन्ही भागांनी प्रत्येकी हजार कोटींचा व्यवसाय केला. त्यानंतर यशची फी वाढवण्यात आली. रिपोर्ट्सनुसार, यश एका चित्रपटासाठी १२० ते १५० कोटी रुपये घेतो.

तेलुगू अभिनेता महेश बाबूने तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्येही काम केले आहे. हिंदी भाषेतील प्रेक्षकांनाही महेश बाबू खूप आवडतात. डीएनए रिपोर्टनुसार, महेश बाबू एका चित्रपटासाठी ८० ते १०० कोटी रुपये मानधन घेतो.

अभिनेता प्रभासच्या चित्रपटांना देशभरातून पसंती मिळते. डीएनए रिपोर्टनुसार, प्रभास फी म्हणून १५० ते २०० कोटी रुपये घेतो.

दक्षिणेतील सुपरस्टार कमल हासन ज्यांनी अनेक दशकांपासून चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले आहे. रिपोर्ट्सनुसार, कमल हासन एका चित्रपटासाठी १०० ते १२० कोटी रुपये घेतात.

लोक तामिळ आणि तेलुगू सिनेमांचा सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या सिनेमांची वाट पाहत असतात. डीएनए रिपोर्टनुसार अल्लू अर्जुन एका चित्रपटासाठी १०० ते १३० कोटी रुपये घेतो.

ज्युनियर एनटीआर एक तेलुगु चित्रपट अभिनेता आहे. तर त्यांनी इतर भाषांमधील चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्याला तेलुगू सिनेमाचा 'यंग टायगर' असेही म्हटले जाते. त्याचे खरे नाव नंदपुरी तारक रामाराव आहे. डीएनएनुसार, ज्युनियर एनटीआर फी म्हणून १०० ते १५० कोटी रुपये घेतो.