Pushpa 2 : शाहरूख- सलमान नव्हे ‘पब्लिक’ला हवा अल्लू अर्जुन! रिलीजआधीच  ‘पुष्पा 2’चा कारनामा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 06:04 PM2022-10-21T18:04:32+5:302022-10-21T18:05:01+5:30

Most Awaited Hindi Film Of 2023 : पुष्पा 2, पठान, जवान, टायगर 3, डंकी असे अनेक सिनेमे नव्या वर्षांत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. पण अल्लू अर्जुनने शाहरूख खान व सलमान खानला मागे टाकलं आहे...

Allu Arjun Pushpa 2 Become Most Awaited Hindi Film Of 2023 Surpassed Shah Rukh Khan Pathaan Salman Khan Tiger 3 | Pushpa 2 : शाहरूख- सलमान नव्हे ‘पब्लिक’ला हवा अल्लू अर्जुन! रिलीजआधीच  ‘पुष्पा 2’चा कारनामा!!

Pushpa 2 : शाहरूख- सलमान नव्हे ‘पब्लिक’ला हवा अल्लू अर्जुन! रिलीजआधीच  ‘पुष्पा 2’चा कारनामा!!

googlenewsNext

Most Awaited Hindi Film Of 2023 : पुढील वर्षी म्हणजे 2023 मध्ये अनेक मोठे सिनेमे रिलीज होणार आहेत. पुष्पा 2 ( Pushpa 2), पठान, जवान, टायगर 3, डंकी असे अनेक सिनेमे नव्या वर्षांत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. पण अल्लू अर्जुनने (Allu Arjun) शाहरूख खान (Shah Rukh Khan) व सलमान खानला (Salman Khan ) मागे टाकलं आहे. होय, कारण चाहते शाहरूख व सलमानच्या सिनेमापेक्षा अल्लू अर्जुनच्या सिनेमाची अधिक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.  होय, शाहरूखचा ‘पठान’ (Pathaan) आणि सलमानच्या ‘टायगर 3’ पेक्षा (Tiger 3 ) चाहत्यांना अल्लूच्या ‘पुष्पा 2’ची प्रतीक्षा आहे. एका सर्वेक्षणानुसार, लोक अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ पाहण्यासाठी उतावीळ झाले आहेत.
  
सध्या  ‘पुष्पा 2च्या प्री-प्रॉडक्शनचं काम सुरू आहे. येत्या काही दिवसांत या सिनेमाचं शूटिंग सुरु होणार आहे. पण हा सिनेमा पाहण्यास पब्लिक जास्त आतूर आहे.

Ormax Mediaने नुकतंच ‘मोस्ट अवेटेड मुव्ही’बाबत एक पाहणी केली. या पाहणीत, अल्लू अर्जुनचा  ‘पुष्पा 2’ हा सिनेमा नंबर वन पदावर आहे. म्हणजेच अल्लूचा हा सिनेमा पाहण्यास लोक जास्त आतूर आहेत. यापाठोपाठ पब्लिकला शाहरूखच्या ‘पठान’ची प्रतीक्षा आहे. तिसºया नंबरवर सलमान खानचा ‘टायगर 3’ आहे.  चौथ्या आणि पाचव्या नंबरवर शाहरुखचा  जवान  आणि  डंकी  हे दोन सिनेमे आहेत.
‘पुष्पा 2’बद्दल सांगायचं झाल्यास हा सिनेमा पाच भाषांत रिलीज होणार आहे. ‘पुष्पा 2’ हा सिनेमा सुकुमार दिग्दर्शित करणार आहेत. अल्लू अर्जुनशिवाय फहाद फासिल व रश्मिका मंदाना यात लीड रोलमध्ये आहेत.

शाहरुख खानचा ‘पठान’ हा सिनेमा 25 जानेवारी 2023 मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात शाहरूखसोबत दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम लीड भूमिकेत आहेत.  शाहरुखच्याच ‘जवान’ सिनेमात साऊथची अभिनेत्री नयनतारासोबत लीडमध्ये दिसेल. शाहरुख खान राजकुमार हिरानीच्या ‘डंकी’ सिनेमातही काम करत आहे. 

‘टायगर 3’मध्ये सलमान व कतरिनाची जोडी पाहायला मिळणार आहे.  हा सिनेमा दिवाळीत 2023 मध्ये रिलीज केला जाणार आहे. या फ्रँचायजीचा हा तिसरा सिनेमा आहे.  

Web Title: Allu Arjun Pushpa 2 Become Most Awaited Hindi Film Of 2023 Surpassed Shah Rukh Khan Pathaan Salman Khan Tiger 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.