अल्लु अर्जुनच्या 'पुष्पा २'च्या टीमच्या बसचा अपघात, प्रवासादरम्यान घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 04:07 PM2023-05-31T16:07:08+5:302023-05-31T16:20:54+5:30

‘पुष्पा 2’ची टीमच्या बसचा अपघात झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या कलाकारांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

Allu arjun pushpa 2 team bus big accident during the journey | अल्लु अर्जुनच्या 'पुष्पा २'च्या टीमच्या बसचा अपघात, प्रवासादरम्यान घडली दुर्घटना

अल्लु अर्जुनच्या 'पुष्पा २'च्या टीमच्या बसचा अपघात, प्रवासादरम्यान घडली दुर्घटना

googlenewsNext

Pushpa 2: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) स्टारर फिल्म 'पुष्पा २' (Pushpa 2)ची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. चित्रपटाचा प्रमोशन व्हिडीओ समोर आल्यापासून या चित्रपटाबाबत बरीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटाच्या टीमबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. चित्रपटाचे शूटिंग संपवून बसमधून परतणाऱ्या टीमचा अपघात झाला आहे.  


'पुष्पा 2' च्या शूटिंगनंतर आंध्र प्रदेशातून हैदराबादला परतणाऱ्या चित्रपट कलाकारांना घेऊन जाणाऱ्या बसला बुधवारी तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात अपघात झाला, यात दोन जण जखमी झालेत. हैदराबाद-विजयवाडा महामार्गावर नरकटपल्ली येथे पुष्पा २च्या टीमची बस आरटीसी बसला धडकली. अपघातात जखमी झालेल्या कलाकारांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. 

 पुष्पा: द राइज (Pushpa: The Rise) हा सिनेमा २०२१ चा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा होता. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या सिनेमाचा डायलॉग 'झुकेगा नहीं' अद्यापही लोकांच्या ओठांवर आहे. पुष्पा हा २०२१ मधील सर्वात मोठा चित्रपट ठरला. 'पुष्पा द राइज'मध्ये अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्ना लीड रोलमध्ये होती. 'पुष्पा द राइज'ने जगभरात ३०० कोटींहून अधिक कमाई केली.  याचमुळे पुष्पाचा दुसरा पार्ट Pushpa: The Rule येणार म्हटल्यावर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे पहिल्या पार्टची कथा जिथे संपली, तिथून Pushpa 2: The Ruleची कथा सुरू होणार आहे. २०१४ च्या सुरुवातीला प्रदर्शित होईल असं बोललं जात आहे.

रश्मिका मंदानाच्या वाढदिवशी 'पुष्पा २' च्या टीझरची झलक दाखवणारा व्हिडीओ मेकर्सनी शेअर केला होता. या टीझरमध्ये दिग्दर्शक सुकुमार यांनी 'पुष्पा २'ची पहिली झलक चाहत्यांना दाखवली होती. 'पुष्पा' तिरुपती तुरुंगातून फरार असल्याचं यात दाखवण्यात आलं होतं. यानंतर अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला 'पुष्पा २'चा टीझर रिलीज केला होता.  पुष्पाराजच्या शोधात भटकत असलेल्या पोलिसांच्या हाती महिनाभरानंतर त्याचा एक व्हिडीओ लागतो. हा व्हिडीओ जंगलातील आहे. ८ गोळ्या लागल्यानंतरही पुष्पा जिवंत असल्याचं यात दिसतं. जंगलात प्राण्यांचे फोटो घेण्यासाठी लावलेल्या वनविभागाच्या कॅमेऱ्यात पुष्पा दिसतो. पुष्पाला पाहून वाघही दचकतो. 'पुष्पा २'मधील पुष्पाराजचा लुक पाहून चाहते क्रेझी झाले आहेत. 
 

Web Title: Allu arjun pushpa 2 team bus big accident during the journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.