अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 03:25 PM2024-10-24T15:25:31+5:302024-10-24T15:26:21+5:30

'पुष्पा २'ची घोषणा झाल्यानंतर चाहते उत्सुक होते. मात्र काही ना काही कारणामुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येत होती. आता अखेर 'पुष्पा २' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली आहे. 

allu arjun rashmika mandanna pushpa 2 movie will release on 5 dec | अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असलेल्या 'पुष्पा २'सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या पुष्पाने चाहत्यांना वेड लावलं होतं. तेव्हापासून या सिनेमाच्या सीक्वलच्या प्रेक्षक प्रतिक्षेत होते. त्यामुळेच 'पुष्पा २'ची घोषणा झाल्यानंतर चाहते उत्सुक होते. मात्र काही ना काही कारणामुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येत होती. आता अखेर 'पुष्पा २' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली आहे. 

'पुष्पा २' संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. आधी १५ ऑगस्टला अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण, काही तांत्रिक कारणांमुळे सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली होती. त्यानंतर ६ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत होतं. पण, पुन्हा एकदा रिलीज डेट बदलल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला होता. आता अखेर 'पुष्पा २' सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत खुद्द अल्लू अर्जुननेच उलगडा केला आहे. 

अल्लू अर्जुनने त्याच्या सोशल मीडियावरुन 'पुष्पा २' सिनेमाचं नवं पोस्टर शेअर करत सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. आता 'पुष्पा २'साठी प्रेक्षकांनी फक्त काही दिवसच वाट पाहावी लागणार आहे. कारण, ५ डिसेंबरला अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहतेही आनंदी आहेत. लवकरच सिनेमाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


'पुष्पा २'च्या प्रदर्शनाआधीच त्यातील गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 'पुष्पा २' सिनेमाचा टीझर आणि त्यातील गाण्यांमुळे सिनेमाबाबत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता प्रेक्षक ट्रेलरच्या अपेक्षित असून लवकरच सिनेमाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: allu arjun rashmika mandanna pushpa 2 movie will release on 5 dec

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.