तब्बल १७ वर्षे रेखा यांना विसर पडला त्यांच्या या कोटींच्या संपत्तीचा, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 09:00 PM2019-12-08T21:00:00+5:302019-12-08T21:00:00+5:30

अभिनेत्री रेखा या कित्येक दशकांपासून सिनेइंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवत आहेत.

For almost 17 years, Rekha has forgotten the wealth of these crores, read in detail | तब्बल १७ वर्षे रेखा यांना विसर पडला त्यांच्या या कोटींच्या संपत्तीचा, वाचा सविस्तर

तब्बल १७ वर्षे रेखा यांना विसर पडला त्यांच्या या कोटींच्या संपत्तीचा, वाचा सविस्तर

googlenewsNext

बॉलिवूडच्या सौंदर्यवती अभिनेत्री रेखा या कित्येक दशकांपासून सिनेइंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवत आहेत. त्या त्यांच्या सौंदर्य व अदाकारीसाठी ओळखल्या जातात. पन्नास वर्षांच्या करियरमध्ये त्यांनी जवळपास १८० चित्रपटात काम केले आहे. रेखा यांनी ६०च्या दशकात आपल्या सिनेकरियरला सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही.


 रेखा यांच्या आयुष्यातील एक इंटरेस्टिंग स्टोरी म्हणजे त्यांची खासगी संपत्तीचा त्यांना विसर पडला होता आणि ते सुद्धा तब्बल १७ वर्षांसाठी.
२००३ साली एकेदिवशी रेखा यांना फोन आला आणि तो आवाज असतो कोर्टातून कोण्या व्यक्तीचा. आणि ती व्यक्ती रेखाला सांगते की तुम्ही कोर्टात या, अर्जावर सही करा, आणि तुमचे ४८ वेगवेगळ्या प्रकारच्या सोनाच्या ज्वेलरी ठेवलेल्या आहेत, त्यांना येऊन घेऊन जा.


रेखा स्वतः हैराण होत्या की इतके वर्ष इतकी महत्वाची गोष्ट कशा काय विसरल्या. खरंतर १९८६ मध्ये रेखा यांच्या घरी चोरी झाली होती आणि घरातील खूप सोनं चोरीला गेले होते. त्यानंतर त्यांनी लगेच पोलिस स्थानकात तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी ४ ते ५ महिन्यांतच चोराला पकडले.

चोराचे नाव होते मोनीराज कणप्पा. त्याने रेखा यांच्या घरातील ४८ प्रकारच्या सोन्याचे दागिने चोरले होते. नंतर कोर्टाने सर्व दागिने जप्त करून स्वतःजवळ ठेवले आणि चोराला शिक्षा सुनावली. चोराला ५ ते ७ वर्षांची शिक्षा झाली. चोर आपली शिक्षा पूर्ण करून बाहेर सुद्धा आला.


मात्र रेखा ही गोष्ट विसरून गेल्या की त्यांचे दागिने कोर्टात ठेवले आहेत. अचानक २०१३ मध्ये त्यांना कोर्टातून फोन आला आणि 
तिला दागिन्यांची आठवण झाली. रेखा १७ वर्षे ज्या ज्वेलरीपासून दूर होत्या त्या त्यांनी पुन्हा मिळविल्या.

Web Title: For almost 17 years, Rekha has forgotten the wealth of these crores, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rekhaरेखा