अमरनाथ दहशतवादी हल्ल्यामुळे दु:खी - शाहरुख खान

By Admin | Published: July 12, 2017 02:07 PM2017-07-12T14:07:22+5:302017-07-12T14:09:33+5:30

अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुख: आणि निषेध व्यक्त केला आहे

Amarnath is sad due to terrorist attacks - Shahrukh Khan | अमरनाथ दहशतवादी हल्ल्यामुळे दु:खी - शाहरुख खान

अमरनाथ दहशतवादी हल्ल्यामुळे दु:खी - शाहरुख खान

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुख: आणि निषेध व्यक्त केला आहे. देशभरातून प्रतिक्रिया उमटत असताना बॉलिवूड सेलिब्रेटिंनीही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. बॉलिवूड बादशहा शाहरुख खाननेदेखील ट्विटरच्या माध्यमातून घटनेचा निषेध करत दुख: व्यक्त केलं आहे. याआधी अक्षय कुमारनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून निषेध करत संताप व्यक्त केला होता. 
 
आणखी वाचा 
अमरनाथ यात्रा हल्ल्याबाबत सेहवागचं भावनिक ट्विट
अमरनाथ यात्रा हल्ल्याबाबत अक्षय कुमारनं व्यक्त केला संताप
 
‘निर्दोष लोकांच्या मृत्यूनं मी दु:खी झालो आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईंकांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच देवाचरणी प्रार्थना’, असं ट्विट शाहरुख खानने केलं आहे. 
 
दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात अंदाधुंद गोळीबार केल्याने त्यात ७ भाविक मरण पावले आणि तीन पोलिसांसह ३२ जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पाच महिला यात्रेकरू आहेत.
 
अभिनेता अक्षय कुमारनेही तीव्र शब्दांत या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला होता. अमरनाथ यात्रेतील निर्दोष भाविकांवरील हल्ला निंदनीय आहे. रागही आला आहे आणि दुःखही आहे, असे ट्विट करुन खिलाडी अक्कीनं अमरनाथ हल्ल्याबाबत संताप व्यक्त केला होता. 
 
सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असणा-या भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवागनेही भावनिक ट्विट केलं होतं. "जेव्हा मुलगा सैन्यात भरती होऊन शहीद होतो, तेव्हा त्याची आई रडते. जेव्हा धार्मिक क्षेत्रावर दहशतवादी हल्ला होतो, आणि आईचा मृत्यू होतो, तेव्हा मुलगा रडतो, देव करो आणि अशी वेळ कुणावरही न येवो", असं ट्विट सेहवागने केलं होतं. सेहवागच्या या ट्विटला अनेकजणांनी रिट्विट केलं होतं.
 
कसा झाला हल्ला ?
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (11 जुलै ) ज्या बसने हे यात्रेकरू निघाले होते, ती मुख्य यात्रेचा भाग नव्हती आणि अमरनाथ देवस्थान बोर्डाकडे त्या बसची नोंदही नव्हती. त्यामुळे त्या बसला केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा पुरवण्यात आली नव्हती. बस अनंतनाग जिल्ह्यातून जात असताना रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्या गोळीबारात सहा जण जागीच तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.
 
ही बस सोनमर्गहून आली होती. अमरनाथांचे दर्शन घेतल्यानंतर याचमार्गे यात्रेकरू जम्मूच्या मार्गावर होते. रात्री सात वाजेनंतर महामार्गावर यात्रेकरूंचे वाहन चालविण्याची परवानगी नाही. असे स्पष्ट निर्देश असताना यात्रेकरूंसाठी असलेल्या वाहतूक नियमांचे बसचालकाने उल्लंघन केले, असा दावा पोलिसांनी केला आहे.
 

Web Title: Amarnath is sad due to terrorist attacks - Shahrukh Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.