Amazig 'या' ठिकाणी धर्मेंद्र घालवतायेत निवांत क्षण, फार्म हाऊसचा Video शेयर करत म्हणाले......
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 02:33 PM2020-10-09T14:33:12+5:302020-10-09T14:33:49+5:30
बाजरीची भाकरीसह लोणीचा आस्वाद घेतल्यानंतर आरामात बसलोय असे सांगत असल्याचे पाहायला मिळतंय. या व्हिडिओसोबत प्रत्येक क्षणाचा आनंद लुटत असल्याचे पाहायला मिळतंय.
८०च्या दशकात एकाहून एक सरस चित्रपट देणारे आणि आजतागायत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेता म्हणजे धर्मेंद्र. कुणी त्यांना बॉलीवूडचे हिमॅन म्हणतं तर कुणी वीरू… रसिकांनी धरमपाजींवर कायमच प्रेम केलं आहे. आजही धर्मेंद्र यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. धरमपाजीं सोशल मीडियावर सक्रीय असून तिथंही त्यांच्या चाहत्यांसह संवाद साधत असतात. सध्या धर्मेंद्र आपल्या फार्म हाऊसवर निवांवत वेळ घालवत आहेत. मोकळ्या वेळेत सोशल मीडियावर आपल्या फार्महाऊसचे फोटो शेअर करत असतात.
Good morning ☀️ love ❤️ you all for your loving 🥰 response...... pic.twitter.com/yrJHmMjkOE
— Dharmendra Deol (@aapkadharam) October 9, 2020
आपला बराच वेळ ते इथंच घालवतात. नुकतंच त्यांनी आपल्या बंगल्याची झलक चाहत्यांना दाखवली. सोशल मीडियावर धरमपाजींनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून या बंगल्याची किंमत कोट्यवधीच्या घरात असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. या बंगल्यात मोठमोठ्या मूर्ती आणि कारंजे पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये स्वतः धरमपाजीसुद्धा दिसत आहेत.
Good morning 🌞 friends 🙏 pic.twitter.com/gO8NNgrgfZ
— Dharmendra Deol (@aapkadharam) July 26, 2020
बाजरीची भाकरीसह लोणीचा आस्वाद घेतल्यानंतर आरामात बसलोय असे सांगत असल्याचे पाहायला मिळतंय. या व्हिडिओसोबत प्रत्येक क्षणाचा आनंद लुटत असल्याचे पाहायला मिळतंय.धरमपाजींच्या या पोस्टला त्याच्या चाहत्याने उत्तर दिलं आहे. ''लव यू धरमपाजी” अशा शब्दांत चाहते आपली प्रतिक्रिया देत आहेत. धर्मेंद्र यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे.
Dear friends, love you ❤️ all for your most loving 🥰 comments for BARSAAT, Bobby and Deols.....Kaassh main sab ko jawaab de paata . I think we feel for each other. Once again thanks 🙏 and love ❤️ ❤️❤️❤️❤️. pic.twitter.com/BAx9mcE8Sx
— Dharmendra Deol (@aapkadharam) September 30, 2020
धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये अर्जुन हिंगोरानी यांच्या 'दिल भी तेरा हम भी तेरे' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 1970 च्या दशकात धर्मेंद्र जगातील सर्वात देखण्या आभिनेतापैकी एक होते. धर्मेंद्र यांना वर्ल्ड आयर्न मॅन अवॉर्डही देण्यात आला आहे. धर्मेंद्रच्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये 'सत्यकाम', 'खामोशी', 'शोले', 'क्रोधी' आणि 'यादों की बरात' यांचा समावेश आहे.