अमेयच्या प्रेमाचा "मुरांबा" मुरला, लवकरच अडकणार विवाहबंधनात

By Admin | Published: June 21, 2017 12:26 AM2017-06-21T00:26:16+5:302017-06-21T00:30:48+5:30

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून प्रसिद्धीस आलेला अमेय वाघ लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तेरा वर्षांच्या मैत्रीचे रुपांतर अखेर विवाहबंधनात होणार आहे.

Ameya's love "Murama" faded, soon caught in a marriage | अमेयच्या प्रेमाचा "मुरांबा" मुरला, लवकरच अडकणार विवाहबंधनात

अमेयच्या प्रेमाचा "मुरांबा" मुरला, लवकरच अडकणार विवाहबंधनात

googlenewsNext

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून प्रसिद्धीस आलेला अमेय वाघ लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तेरा वर्षांच्या मैत्रीचे रुपांतर अखेर विवाहबंधनात होणार आहे. बालमैत्रिण साजिरी देशपांडे बरोबर अमेय लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. खुद्द अमेयने आपल्या फेसबुक पेजवर याबद्दलची माहिती दिली आहे.
हजारो मुलींच्या हदयाची धडकन असलेल्या अमेय वाघच्या प्रेमाचा मुरंबा तब्बल 13 वर्ष मुरला. त्यानंतर त्याने आपली बालमैत्रीण साजिरी देशपांडे हिच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे. गेल्या 13 वर्षांपासून साजिरी आपल्याला सहन करत आली आणि यापुढेही आपण असेच आनंदी राहू शकतो असा विश्वास आहे, असं सांगत अमेयने साजिरीसोबतच्या लग्नाची बातमी दिलीय. अमेयने साजिरीसोबतचा फोटो पोस्ट करून आपल्या नव्या इनिंगची सुरुवात होण्यास आता केवळ 12 दिवस राहिले असल्याचं सांगितले आहे. अमेयच्या या पोस्टनंतर त्याच्यावर शुभेच्छांचाही वर्षाव सुरू आहे.

अमेय वाघ सोबत लग्न करणारी त्याची बालमैत्रीण साजिरी देशपांडे मुंबईतमध्ये Colgate Global Business Services Private Ltd या कंपनीमध्ये काम करत आहे. मुरांबा चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणारी मिथिला पालकर हिच्यासोबत याआधी अमेयचं नाव जोडलं गेलं होतं. दोघं रिलेशनशीपमध्ये असल्याच्याही बातम्या पुढे आल्या होत्या. मात्र, त्या दोघांनी नाकारलं होत आमची फक्त मैत्री असल्याचं सांगितलं होत. पण अमेयच्या आजच्या फेसबुक पोस्टनंतर मिथिलासोबतच्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

 

Web Title: Ameya's love "Murama" faded, soon caught in a marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.