'कयामत से कयामत'साठी आमिरला मिळालेलं मानधन वाचून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 19:31 IST2018-05-24T19:30:02+5:302018-05-24T19:31:24+5:30
30 वर्षांपूर्वी आलेल्या 'कयामत से कयामत'मुळे आमिर खान स्टार झाला

'कयामत से कयामत'साठी आमिरला मिळालेलं मानधन वाचून थक्क व्हाल
मुंबई: परफेक्शनिस्ट आमिर खान आणि अभिनेत्री जुही चावलाच्या 'कयामत से कयामत' चित्रपटाला 30 वर्ष पूर्ण झाली आहेत. काही दिवसांपूर्वीच आमिरनं या निमित्तानं सेलिब्रेशन केलं होतं. 1988 मध्ये आलेल्या या चित्रपटामुळे आमिर खान स्टार झाला. आज कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या आमिरला त्या चित्रपटासाठी मिळालेलं मानधन वाचून तुम्हाला धक्का बसेल.
आमिरनं 'कयामत से कयामत तक'मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. आमिरची ही भूमिका चांगलीच गाजली होती. या भूमिकेसाठी आमिरला फक्त 11 हजार रुपये मिळाले होते. आमिरनं एका मुलाखतीत ही गोष्ट सांगितली. याशिवाय आमिरनं या चित्रपटाशी संबंधित एक किस्साही सांगितला. चित्रपट इतका लोकप्रिय होऊनही त्यावेळी माझ्याकडे गाडी खरेदी करता येईल इतके पैसे नव्हते, असं आमिरनं सांगितलं.
'कयामत से कयामत चित्रपट खूप गाजला. लोकांनी चित्रपट डोक्यावर घेतला. मात्र तरीही त्यावेळी माझ्याकडे गाडी घेण्यासाठी पैसे नव्हते. लोक मला ओळखू लागले नव्हते, तेव्हापर्यंत मी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करायचो,' अशी आठवण आमिरनं सांगितली. मी आजही 'कयामत से कयामत'मधील माझ्या कामाविषयी आनंदी नाही, असंही तो पुढे म्हणाला. 'चित्रपटाचं चित्रिकरण पुन्हा एकदा करण्यात यावं, असं मी त्यावेळी दिग्दर्शकांना म्हटलं होतं. सर्वांना जुहीचं काम आवडेल, माझं काम कोणालाच पसंत पडणार नाही, असं मला त्यावेळी वाटलं होतं. मात्र माझं काम लोकांना आवडलं, हे मी माझं भाग्य समजतो,' असंही आमिरनं मुलाखतीत म्हटलं.