आमिरच्या लेकीचा व्हिडिओ चर्चेत, पापाराझींसमोर म्हणाली, "आत्महत्या हा विचार..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 09:28 AM2023-09-11T09:28:43+5:302023-09-11T09:30:49+5:30

इरा खान काल मुंबईतील एका कॅफे समोर दिसली.

amir khan s daughter ira khan makes awareness on world suicide prevention day | आमिरच्या लेकीचा व्हिडिओ चर्चेत, पापाराझींसमोर म्हणाली, "आत्महत्या हा विचार..."

आमिरच्या लेकीचा व्हिडिओ चर्चेत, पापाराझींसमोर म्हणाली, "आत्महत्या हा विचार..."

googlenewsNext

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी इरा खान (Ira Khan) मध्यंतरी चर्चेत आली होती. तिने फिटनेस ट्रेनरसोबत नुकताच साखरपुडा केला. इरा खान बरीच वर्ष डिप्रेशनमध्ये होती. अगदी आत्महत्येचे विचारही तिच्या मनात यायचे. अनेक वर्षांनी ती यातून बाहेर आली. कालच 'जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस' (World Suicide Prevention Day) होता. इरा स्वत: यातून गेली आहे. त्यामुळे ती जनजागृती करते. काल तिने जनजागृती केल्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

इरा खान काल मुंबईतील एका कॅफे समोर दिसली. यावेळी पापाराझींनी तिला कॅमेऱ्यात कैद केले. ब्लॅक क्रॉप टॉप आणि ब्लॅक जीन्स अशा कॅज्युअल लुकमध्ये ती दिसली. तर यावर तिने कानात झुमके घातले होते. इरा म्हणाली, 'आज सुसाईड प्रिव्हेन्शन डे आहे. म्हणजे आत्महत्येपासून एखाद्याला रोखण्याचा दिवस. आत्महत्या हा विचार खूपच भयानक आहे. हे लोक कोणाला काही सांगू शकत नाहीत. तुम्ही अशा लोकांना विचारलं त्याबद्दल तर त्यांना वाटेल की कोणीतरी आहेतुम्हाला यावर बोलताना घाबरायची गरज नाही. ज्यांच्याशी आपण यावर बोलू शकतो. आपण त्यांच्याशी या विषयावर बोललो तर उलट त्यांच्या मनात असे विचार येतील असं आपल्याला वाटतं पण असं होत नाही.'

इराच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 'चांगलं काम करतेय' असं म्हणत युझर्सने तिचं कौतुकच केलं आहे. इरा खान फिटनेस ट्रेनर नुपूर शिर्केसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यांचा मागील वर्षी साखरपुडा झाला. लवकरच दोघंही लग्नबंधनात अडकणार आहेत. 

Web Title: amir khan s daughter ira khan makes awareness on world suicide prevention day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.