अमिता कुलकर्णी आणि रोहित शिवलकर यांची नवीन मालिका 'प्रेमास रंग यावे'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 07:32 PM2023-02-18T19:32:54+5:302023-02-18T19:33:15+5:30

'प्रेमास रंग यावे' मालिकेत अक्षरा आणि सुंदरची कथा रेखाटण्यात आली आहे,

Amita Kulkarni and Rohit Shivlakar's new serial 'Premas Rang Yave' | अमिता कुलकर्णी आणि रोहित शिवलकर यांची नवीन मालिका 'प्रेमास रंग यावे'

अमिता कुलकर्णी आणि रोहित शिवलकर यांची नवीन मालिका 'प्रेमास रंग यावे'

googlenewsNext

सन मराठी वाहिनीवर अशीच एक वेगळी गोष्ट घेऊन येत आहे. आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे नेमकं कशावर प्रेम करतो? त्या व्यक्तीच्या रंग-रूपावर, श्रीमंतीवर, की त्या व्यक्तीच्या चांगुलपणावर, त्याच्या सुंदर मनावर? २० फेब्रुवारीपासून, सोमवार ते शनिवार रात्री ९.३०वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येत असलेली 'प्रेमास रंग यावे ही मालिका नेमकी याच प्रश्नाभोवती फिरते. ही गोष्ट आहे एका अत्यंत हुशार, सालस, सहृदयी अक्षराची आणि एका चांगल्या मनाच्या पण खुशालचेंडू, न्यूनगंडाने भरलेल्या आणि पारंपरिक अर्थाने देखणा नसलेल्या सुंदरची.

सन मराठीवरील ही नवीन मालिका सुंदर दिसण्यापेक्षा चांगलं माणूस असणं कितीतरी पटीने जास्त महत्वाचं आहेत ह्याची जाणीव करून देते शिवाय मन चांगलं असेल तर मनासारखा जोडीदारही मिळतो हे पटवून देते. कारण म्हणतात ना, प्रेमासारखं दुसरं कुठलं सुख नाही. प्रेमाला कुठला  रंग, कुठलं रूप नाही.


या मालिकेत मनमिळाऊ आणि सगळ्यांना आपलंसं करणाऱ्या 'अक्षरा' या मुख्य पात्राच्या भूमिकेत अभिनेत्री अमिता कुलकर्णी असून निर्मळ मनाच्या पण शून्य व्यवहारज्ञान असलेल्या सुंदरची भूमिका सादर करणार आहे अभिनेता रोहित शिवलकर. या सोबतच समीरा गुजर- जोशी, अभिजित चव्हाण, सारिका नवाथे, मोनिका दाभाडे, संजीव तांडेल,किरण डांगे, सचिन माने, गौरी कुलकर्णी, विद्या संत असे अनेक कलाकार मालिकेत दिसणार आहेत. या मालिकेची निर्मिती  डॉ.अमोल कोल्हे यांची जगदंब ही निर्मिती संस्था करत असून मालिकेचे दिग्दर्शन चंद्रकांत गायकवाड यांनी केले आहे.

Web Title: Amita Kulkarni and Rohit Shivlakar's new serial 'Premas Rang Yave'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.