अमिताभ बच्चन यांना मुंबईचा 'हा' चविष्ट पदार्थ खायला खूप आवडतो, KBC च्या मंचावर खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 03:29 PM2024-10-22T15:29:44+5:302024-10-22T15:30:54+5:30

अमिताभ बच्चन यांना मुंबईतील रस्त्यांवर मिळणारा हा पदार्थ खायला खूप आवडतं.

Amitabh Bachchan always loves to eat Mumbai style vadapav revealed in kbc16 | अमिताभ बच्चन यांना मुंबईचा 'हा' चविष्ट पदार्थ खायला खूप आवडतो, KBC च्या मंचावर खुलासा

अमिताभ बच्चन यांना मुंबईचा 'हा' चविष्ट पदार्थ खायला खूप आवडतो, KBC च्या मंचावर खुलासा

कौन बनेगा करोडपती’च्या १६ व्या सीझनने प्रेक्षकांवर आपली मजबूत पकड ठेवली आहे. अमितभ त्यांच्या उत्कृष्ट संभाषणचातुर्याचा वापर करुन  KBC 16 चं होस्टिंग करत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या खास सूत्रसंचालनामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना KBC पाहायला खूप आवडतं. स्पर्धकांच्या भावुक करणाऱ्या कथा, या खेळातील बौद्धिक थरार आणि बिग बी यांचे मोहक सूत्रसंचालन यामुळे समस्त देशाचा हा आवडता शो बनला आहे. अशातच KBC 16 च्या मंचावर अमिताभ यांनी त्यांना आवडणाऱ्या पदार्थाचा उल्लेख केलाय. 

हा पदार्थ अमिताभ बच्चन यांना खूप आवडतो

अमिताभ बच्चन यांचं खुमासदार सूत्रसंचालन KBC 16 ची रंगत वाढवतंय. अशातच KBC 16 च्या मंचावर  गुजरातमध्ये राहणारी आर्ट्स आणि क्राफ्ट्स तसेच संगीत शिक्षिका हर्षा उपाध्याय हॉट सीटवर विराजमान झालेली दिसेल. तिचा शिकवण्याचा ध्यास आणि चिकाटीने केलेला प्रवास तुम्हाला नक्कीच प्रेरणा देऊन जाईल. त्यावेळी एका अन्नाशी संबंधित प्रश्नांनंतर हलक्या-फुलक्या गप्पा मारताना हर्षा उपाध्यायने अमिताभ बच्चन यांना विचारले की, त्यांना चुरमा आवडतो का.


त्यावर अमिताभ यांनी गालातल्या गालात हसत उत्तर दिले की, कदाचित सगळे पदार्थ त्यांना माहीत नसतील, पण एक पदार्थ आहे जो त्यांना अत्यंत प्रिय आहे तो म्हणजे वडापाव! अमिताभ याविषयी म्हणाले की, “वडापावपेक्षा चांगली दुसरी कोणतीच गोष्ट नाही. छोटासा असतो, पण काय छान लागतो.. सगळीकडे मिळतो.. फक्त देशातच नाही, विदेशातही.” या गंमतीदार संभाषणाने प्रेक्षकांना खूप हसवले. अशाप्रकारे वडापाव हा पदार्थ अमिताभ यांचा ऑल टाईम फेव्हरेट आहे,  याचा सर्वांना खुलासा झाला.

Web Title: Amitabh Bachchan always loves to eat Mumbai style vadapav revealed in kbc16

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.