अमिताभ बच्चन यांनी स्वतःला गिफ्ट केली अलिशान कार! गाडीची किंमत माहितेय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 01:56 PM2024-10-17T13:56:25+5:302024-10-17T13:57:04+5:30

भारतीय सिनेसृष्टीतील महानायक म्हणून अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan) यांनी ११ ऑक्टोबर रोजी ८२ वा वाढदिवस सेलिब्रेट केला.  वाढदिवसानिमित्त ...

Amitabh Bachchan celebrated his 82nd birthday by adding a BMW i7 electric luxury sedan worth Rs 2.03 crore to his collection | अमिताभ बच्चन यांनी स्वतःला गिफ्ट केली अलिशान कार! गाडीची किंमत माहितेय?

अमिताभ बच्चन यांनी स्वतःला गिफ्ट केली अलिशान कार! गाडीची किंमत माहितेय?

भारतीय सिनेसृष्टीतील महानायक म्हणून अमिताभ बच्चन( Amitabh Bachchan) यांनी ११ ऑक्टोबर रोजी ८२ वा वाढदिवस सेलिब्रेट केला.  वाढदिवसानिमित्त त्यांना कुटुंब, मित्र आणि चाहत्यांकडून अनेक शुभेच्छा मिळाल्या. ८२  व्या वाढदिवसाला  अमिताभ बच्चनने स्वत:ला एक नवीन आलिशान कार भेट दिली. या नवीन कारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

अमिताभ बच्चन यांनी नवी कोरी BMW i7 लक्झरी सेडान इलेक्ट्रिक कारखरेदी केली आहे. इंस्टाग्रामवरील व्हिडिओमध्ये स्टायलिश आणि आलिशान ऑक्साईड ग्रे मेटॅलिक कलरची कार दिसून येत आहे.  या कारची किंमत साधारण २ कोटी रुपये असल्याचं बोलले जात आहे. या कारमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स देखील आहेत.


अभिनेत्याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास नुकतंच त्यांचा 'वेट्टियन' सिनेमा रिलीज झालाय. या चित्रपटात बिग बींसोबत रजनीकांतही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अमिताभ हे जवळपास ५० वर्षांहून अधिक काळ ते इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. १९६९ मध्ये त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. आजपर्यंत आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीत त्यांनी एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. 

Web Title: Amitabh Bachchan celebrated his 82nd birthday by adding a BMW i7 electric luxury sedan worth Rs 2.03 crore to his collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.