वाचा अन् पोटभर हसा! अमिताभ बच्चन यांनी शेअर केला ‘पती-पत्नी’वरचा जोक!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 04:00 PM2019-04-21T16:00:00+5:302019-04-21T16:00:05+5:30
अमिताभ बच्चन त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात, तसेच त्यांच्या जबरदस्त सेन्स ऑफ ह्युमरसाठीही ओळखले जातात. अमिताभ यांना सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांना हे सांगायची गरज नाही.
अमिताभ बच्चन त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात, तसेच त्यांच्या जबरदस्त सेन्स ऑफ ह्युमरसाठीही ओळखले जातात. अमिताभ यांना सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांना हे सांगायची गरज नाही. सोशल मीडियावर त्यांचा हजरजबाबीपणा, त्यांचा विनोदी स्वभाव सगळ्यांचेच दर्शन घडते. अलीकडे आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अमिताभ यांच्या याच स्वभावाचे दर्शन घडले. यावेळी त्यांनी चक्क पत्नी जया बच्चन यांची फिरकी घेतली.
इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक हसरा फोटो शेअर करत त्यांनी एक मजेशीर जोक शेअर केला.
पत्नी- शादी से पहले तुम मुझे होटल, सिनेमा, और न जाने कहां- कहां घुमाते थे शादी हुई तो घर के बाहर भी नहीं ले जाते..
पति- क्या तुमने कभी किसी को...चुनाव के बाद प्रचार करते देखा है।
अमिताभ यांनी शेअर केलेला हा जोक सध्या वेगाने व्हायरल होतोय. आता जया बच्चन यावर काही प्रतिक्रिया देतात का, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.
अगदी अलीकडे अमिताभ बच्चन यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक जोक शेअर केला होता. अमिताभ यांनी शेअर केलेला हा जोक चाहत्यांना चांगलाच भावला होता. अनेक लोकांनी तो शेअर केला होता. तूर्तास अमिताभ ‘तेरा यार हूं मैं’ या चित्रपटात बिझी आहे. हिंदी, तामिळ आणि बंगाली भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या अमिताभ यांच्या चित्रपटाबद्दल सांगायचे तर या चित्रपटात अमिताभ यांच्यासह एस जे सूर्या आणि रम्या कृष्णनन लीड रोलमध्ये आहेत. टी तामिलवनन या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर भूषण कुमार, दिव्या खोसला, कृष्ण कुमार, ओम प्रकाश भट, सुजय शंकरवर या चित्रपटाचे प्रोड्यूसर आहेत.