Amitabh Bachchan : भर पावसात अमिताभ बच्चन यांनी पत्नी जयासाठी धरली छत्री, नेटकरी करतायत कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 11:02 AM2024-07-17T11:02:21+5:302024-07-17T11:02:59+5:30
अमिताभ बच्चन यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे
बिग बी अमिताभ बच्चन हे कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्याचे सतत नवनवे फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल होत राहातात. मात्र, यातील काही फोटो असे असतात जे सगळ्यांचीच मनं जिंकून घेतात. सध्या अशाच एका फोटोनं (Viral Photo) धुमाकूळ घातला आहे. अमिताभ यांचा हा फोटो जया बच्चन यांच्यासोबतच आहे.
अमिताभ बच्चन यांनी ट्विटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ते पत्नी जया बच्चन यांच्या डोक्यावर छत्री धरलेले दिसत आहेत. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलं, 'रोज पाऊस पडत आहे. अगदी सेटवरच्या कामातही'. या फोटोत जया यांच्या हातात लाडूचा डबा दिसत आहे. चाहत्यांनी या फोटोवर प्रेमाचा वर्षाव केला. चाहते अमिताभच्या या कृतीचं खूप कौतुक करत आहेत. काही नेटकऱ्यांनी अमिताभ बच्चन यांचं कौतुक केलं आहे. काहींंनी जया बच्चन या कायम चिडलेल्या असताता का असा सवाल केला आहे. तर एका यूजरनं लिहिलं की, 'शून्य ते प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या प्रत्येक माणसाची हीच अवस्था आहे'.
T 5074 - .... and the rain it raineth every day .. even on set at work .. pic.twitter.com/Sky5FJJbT2
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 16, 2024
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला ५१ वर्षे झाली आहेत. दोघांनी जून 1973 मध्ये लग्न केलं होतं. जेव्हा जया या नात नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाल्या होत्या, तेव्हा त्यांनी वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. अमिताभ बच्चन हे सर्वात जवळचे मित्र असून त्यांच्यापासून त्या कधीही काहीही लपवत नाहीत, असे जया यांनी सांगितलं होतं.