केबीसीत अमिताभ बच्चनसमोर आला 'जुडवा'; ब्रेक घेण्याआधी हातावर चिन्ह काढले, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 04:47 PM2022-09-16T16:47:19+5:302022-09-16T16:48:28+5:30
सेम टू सेम. तसे अमिताभ बच्चन यांना डबलरोल काही नवीन नाही. पण तो पडद्यावरचा वेगळा आणि प्रत्यक्षातला वेगळा. बिग बी फुल टेन्शनमध्ये...
कौन बनेगा करोडपतीचा १४ वा भाग सुरु झाला आहे. यामध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकाला पाहून अमिताभ बच्चन प्रचंड गोंधळात पडले होते. कारण केबीसीच्या सेटवर त्यांना डबलरोल दिसला होता. असा डबलरोल की चेहरा तर सेमच, पण आवाजही सारखाच आणि कपडेही... ओळखायला पण येईना... मग बिग बींनी एक क्लुप्ती लढविली...
अमिताभ बच्चन यांनी फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राऊंड घेतला. यात अनुराग ठाकूर नावाचा तरुण जिंकला. त्याला हॉटसीटवर बसण्यास बोलविण्यात आले. तेव्हा तो जोरजोरात जणूकाही स्पर्धाच जिंकल्यासारखा किंचाळत आला. हॉटसीटवर बसल्यावर अनुरागला बच्चन यांनी सोबत कोणी आलंय का हे विचारले. तेव्हा त्याने हो भाऊ आणि आई आल्याचे म्हटले. अमिताभ यांनी जेव्हा प्रेक्षकांत बसलेल्या त्याच्या भावाकडे पाहिले तेव्हा ते उडालेच.
सेम टू सेम. तसे अमिताभ बच्चन यांना डबलरोल काही नवीन नाही. पण तो पडद्यावरचा वेगळा आणि प्रत्यक्षातला वेगळा. अमिताभ यांनी अनुरागला तो तुझा जुळा भाऊ आहे का विचारले. तो हो म्हणाला. यानंतर अमिताभ यांनी त्यांच्या आईला दोघांमधील वेळेचे अंतर विचारले. त्यांनी अडीच मिनिटे असे सांगितले. इथेच सारा खेळ झाला होता. दोघांचा आवाजही सेम, कपडेही सेम... जुळे तर ते होतेच. अमिताभ बच्चन यांनी या विचारातच खेळ सुरु केला. पण पिक्चर अजून बाकी होता...
ब्रेकचा टाईम आला, आता करायचे काय असा प्रश्न अमिताभ यांना पडला. ब्रेकनंतर हॉट सीटवर अनुराग ऐवजी त्याचा जुळा भाऊ येऊन हॉटसीटवर बसला तर... अमिताभ याच विचारात होते. हा घोळ नको म्हणून खरा स्पर्धक ओळखण्यासाठी अमिताभ यांनी हॉट सीटवर बसलेल्या अनुरागच्या हातावर पेनाने खून करून ठेवली. ब्रेक संपल्यावर अमिताभ यांनी पहिले काय केले असेल तर अनुरागच्या हातावर ती खून आहे का हे पाहिले. नंतर खेळ सुरु केला.
परंतू, अनुराग जास्त वेळ खेळू शकला नाही. सहाव्या प्रश्नापर्यंत अनुरागने सर्व लाईफलाईन संपविल्या होत्या. फक्त फिफ्टी-फिफ्टी लाईफलाईन उरली होती. ती त्याने निवडली. यामुळे सातव्या प्रश्नावर दोन चुकीची उत्तरे हटविली गेली. तरीही तो चुकला आणि फक्त १०००० रुपये घेऊन गेला.
'कौन बनेगा करोड़पति 14' में हाल ही एक ऐसा कंटेस्टेंट हॉटसीट पर बैठा, जिसे देख होस्ट अमिताभ बच्चन हैरान रह गए। इस कंटेस्टेंट का नाम था अनुराग कुमार। अमिताभ बच्चन का फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राउंड जीतकर अनुराग कुमार को जैसे ही हॉटसीट पर बैठने चांस मिला, वह चिल्ला पड़े। अमिताभ बच्चन ने उन्हें बैठने का इशारा किया और फिर हॉटसीट पर स्वागत किया। इसके बाद जब अमिताभ बच्चन ने अनुराग से पूछा कि क्या वह अपने साथ किसी को लाए हैं तो अनुराग ने भाई अनूप की ओर इशारा किया। अमिताभ बच्चन अनुराग कुमार के भाई को देख हैरान रह गए। दोनों हमशक्ल थे।