रवि शास्त्रीच्या एका अटीमुळे रूसली होती अमृता सिंह, नंतर 12 वर्षाने लहान नवाबासोबत थाटला संसार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 01:16 PM2023-02-09T13:16:58+5:302023-02-09T13:17:49+5:30
Amrita Singh Love Life: खाजगी आयुष्याबाबत सांगायचं तर 'बेखुदी' सिनेमादरम्यान ती सैफ अली खानच्या प्रेमात पडली होती. सैफ तिच्यापेक्षा 12 वर्षाने लहान होता. पण दोघेही एकमेकांच्या असे काही प्रेमात पडले होते की, त्यांना वयाचं अंतर काही दिसलं नाही.
Amrita Singh Love Life: सध्या सगळीकडे व्हॅलेंटाईन वीकचा मोहाल बघायला मिळत आहे. अशात एक 80 आणि 90 च्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आपला वाढदिवस साजरा करत आहे. आम्ही सांगतोय ते अभिनेत्री अमृता सिंह (Amrita Singh) बाबत. अमृताच्या जीवनात प्रेम दोनदा आलं. पण तिला तो आनंद कधी मिळाला नाही जो तिला हवा होता.
अमृताचा जन्म 9 फेब्रुवारी 1958 मध्ये झाला होता. अमृताने 1983 मध्ये बेताब सिनेमातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर तिने अनेक मोठ्या स्टारसोबत काम केलं आणि बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी जागा निर्माण केली. सिनेमातील तिचा बिनधास्त अंदाज लोकांना खूप आवडत होता.
सैफसोबत गपचूप केलं होतं लग्न
खाजगी आयुष्याबाबत सांगायचं तर 'बेखुदी' सिनेमादरम्यान ती सैफ अली खानच्या प्रेमात पडली होती. सैफ तिच्यापेक्षा 12 वर्षाने लहान होता. पण दोघेही एकमेकांच्या असे काही प्रेमात पडले होते की, त्यांना वयाचं अंतर काही दिसलं नाही. समाज आणि गॉसिप्सची भीती बाजूलाकरून त्यांनी 1991 मध्ये गुपचूपपणे लग्न केलं. हे सगळ्यांनाच माहीत आहे की, सैफसोबत अफेअर सुरू होण्याआधी अमृता एका भारतीय क्रिकेटरवर फिदा झाली होती.
एक अटीने सगळं बिघडलं...
अमृताचं पहिलं अफेअर क्रिकेटर रवि शास्त्रीसोबत होतं. एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून दोघांची भेट झाली होती. दोघांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली होती. एक वेळ अशी आली होती की, दोघांनी त्यांच्या नात्याला नाव देण्याचा विचारही केला होता.
रवि आणि अमृता दोघांनाही लग्न करायचं होतं. पण असं म्हणतात की, रविने लग्नाआधी अमृतासमोर एक अट ठेवली होती. मीडिया रिपोर्टनुसार, रविची इच्छा होती की, अमृताने लग्नानंतर सिनेमात काम करू नये. हे अमृताला आवडलं नाही. कारण तेव्हा ती यशस्वी करिअरच्या शीखरावर होती. यावर खूप चर्चा झाली. पण काही सोल्यूशन निघालं नाही. अमृताने त्याच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर ती टेंशनमध्ये राहत होती. पण नंतर तिने स्वत:ला कामात बिझी करून घेतलं.
पहिल्या ब्रेकअपनंतर अमृताच्या जीवनात सैफ अली खानची एन्ट्री झाली. पण लग्नानंतर दोघेही एकमेकांपासून दूर गेले. 2 मुलांच्या जन्मानंतर 2004 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर सैफ अली खानने करिना कपूरसोबत लग्न केलं. अमृता मुलांसोबत आता एकटी राहते.