म्हणून सैफ अली खानसह लग्न केल्यानंतर सासू शर्मिला टागोरला पाहताच अमृता सिंहची बोलती व्हायची बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 07:37 PM2021-03-16T19:37:11+5:302021-03-16T19:45:56+5:30
Amrita Singh Bonding With Mother in law Sharmila Tagore: सैफची एक्स वाईफ अमृता सिंगचीही जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, व्हिडीओमध्ये तिने सासू शर्मिला टागोरबद्दल बोलताना दिसत आहे.
अलीकडेच सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी त्यांच्या दुसर्या बाळाचे स्वागत केले आहे. यादरम्यान सैफनेही कामातून ब्रेक घेत करीनाबरोबर पूर्णपणे वेळ एन्जॉय करत होता. करिनाची काळजी घेत होता. अजुनतरी दोघांनीही आपल्या दुसर्या बाळाचा चेहरा चाहत्यांना दाखवला नाहीय. मुलाच्या जन्मानंतर सैफने आता पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे.
आगामी काळात त्याच्याकडे बरेच मोठे प्रोजेक्ट आहेत. सुपरस्टार प्रभाससोबतही 'आदिपुरुष' या सिनेमात रावणची भूमिका साकारताना सैफ दिसणार आहे. सध्या या सिनेमामुळे सैफवरही बरीच चर्चा होत आहे. दरम्यान, सैफची एक्स वाईफ अमृता सिंगचीही जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, व्हिडीओमध्ये अमृता सासू शर्मिला टागोरबद्दल बोलताना दिसत आहे.
लग्नानंतर अमृता सासू शर्मिला टागोर यांना खूप घाबरायची. त्यांच्याबरोबर एकटी जरी असली तरीही तिची बोलती बंद व्हायची. त्यामुळे सैफला तिने सासू शर्मिलाजवळ कधीच एकटीला सो़डू नकोस यासाठी विनवण्या करायची. शर्मिला यांना या दोघांचे कुटुंबाला न सांगता लग्न करणे अजिबात पटले नव्हते. त्यामुळे त्यांनी अमृताला कधीच सून म्हणून स्विकारले नाही.
अमृता सिंह आणि सैफ अली खान आता एकमेकांपासून विभक्त झाले असले तरी त्यांच्या प्रेमकहाणीबद्दलचे अनेक किस्से आजही चर्चेत असतात.सैफनं अवघ्या 20व्या वर्षी अमृता सिंह हिच्याशी लग्नगाठ बांधली होती. त्यावेळी अमृता 32 वर्षांची होती.
सैफहून ती वयानं 12 वर्षे मोठी होती. या दोघांनीही त्यांच्या लग्नाची माहिती गुलदस्त्यातच ठेवली होती. घरातील मंडळी नातं स्वीकारणार नाहीत, अशीच भीती त्यांना होती.१३ वर्ष एकत्र राहिल्यानंतर २००४ मध्ये ते दोघे एकमेकांपासून विभक्त झाले.
अमृता आणि सैफला सारा आणि इब्राहिम दोन मुलं आहेत. घटस्फोटानंतर दोन्ही मुलांची कस्टडी अमृताकडे राहिली. सिनेमांपासूनही अमृता दूर असली तरीही मुलांसह आपला वेळ एन्जॉय करताना दिसते.