आजच्याच दिवशी त्याने मला होकार दिला आणि...! अशी सुरु झाली होती अमृता सुभाषची प्रेमकहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2021 03:30 PM2021-01-03T15:30:00+5:302021-01-03T15:30:02+5:30
रिलेशनशीप अॅनिव्हर्सरी...
मराठीसोबतच हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री अमृता सुभाष वयाच्या 17 व्या वर्षी प्रेमात पडली होती. होय, कोणाच्या तर संदेश कुलकर्णीच्या. हा संदेश कोण तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा भाऊ. त्या दिवशी अमृता सोनालीच्या वाढदिवसाला तिला शुभेच्छा देण्यासाठी तिच्या घरी गेली होती. पण सोनाली आधी अमृताला भेटला तो सोनालीचा भाऊ संदेश. त्याने कुर्ता घातला होता आणि हाताच्या बाह्या दुमडल्या होता. संदेशला पाहिले आणि हाच माझा नवरा..., असा एक आवाज अमृताला आतून ऐकू आला. पुढे दोघांत मैत्री झाली. मात्र प्रेमकहाणी कशी सुरु झाली तर अमृताच्या पुढाकाराने. होय, अमृताने पुढाकार घेत, संदेशला प्रपोज केले. 26 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 3 जानेवारीच्याच दिवशी संदेशने या नात्याला होकार दिला होता.
On this day 26 years ago he said yes to me and here we are.. Sandesh Kulkarni
— Amruta Subhash (@AmrutaSubhash) January 2, 2021
२६ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी त्याने मला होकार दिला आणि ..❤️❤️ pic.twitter.com/i4OJeHNTO6
होय, अमृताने या सुंदर क्षणाच्या आठवणी जाग्या करत, एक पोस्ट शेअर केली आहे. काही फोटो आणि यासोबतचा एक व्हिडीओ अमृताने शेअर केला आहे. ‘26 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी त्याने मला होकार दिला आणि ....’ असे लिहित तिने तिने रिलेशनशीप अॅनिव्हर्सरी साजरी करतानाचे सुंदर क्षण शेअर केले आहेत.
व्हिडीओत अमृता व संदेश एका कॅफेत एक लाईव्ह प्रोग्राम एन्जॉय करताना दिसत आहे. दोघेही अतिशय आनंदात आहेत. फोटोतीलही त्यांच्या चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा आहे.
२६ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी त्याने मला होकार दिला आणि ..❤️❤️
— Amruta Subhash (@AmrutaSubhash) January 2, 2021
On this day 26 years ago he said yes to me and here we are.Sandesh Kulkarni pic.twitter.com/bNeADSYZIQ
अमृताचा पती संदेश कुलकर्णी लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. संदेश आणि अमृताने ब-याच वेळा एकत्र काम केले आहे.
अमृता ही प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती सुभाष यांची मुलगी आहे. अमृताचे शिक्षण दिल्ली येथील नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामध्ये झाले आहे. तिने हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांच्या नाटकात काम केले. तिचे ‘ती फुलराणी’ हे नाटक खूप गाजले. 2004 साली तिने ‘श्वास’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अमृता ही एक प्रशिक्षित शास्त्रीय गायिका सुद्धा आहे. 2012 साली तिने मराठी ‘सा रे ग म प’ या रिअॅलिटी शोच्या सेलिब्रिटी पर्वात भाग घेतला होता. अमृता सुभाष ही उत्तम लेखिका असून तिचे 2014 साली ‘एक उलट एक सुलट’ हे पुस्तक प्रकाशित झाले.