अमृता करते योगासने आणि शीर्षासन!

By Admin | Published: June 19, 2017 03:01 AM2017-06-19T03:01:01+5:302017-06-19T03:01:01+5:30

"वा जले की बारा" फेम अभिनेत्री अमृता खानविलकर कायमच आपल्या फिटनेस आणि आरोग्याबाबत सजग आणि तितकीच काळजी घेत असते.

Amrita Yogasana and Shirshasan! | अमृता करते योगासने आणि शीर्षासन!

अमृता करते योगासने आणि शीर्षासन!

googlenewsNext

"वा जले की बारा" फेम अभिनेत्री अमृता खानविलकर कायमच आपल्या फिटनेस आणि आरोग्याबाबत सजग आणि तितकीच काळजी घेत असते. कायमच काहीतरी वेगळे आणि नाविन्यपूर्ण करण्याच्या शोधात असते. आपलं सौंदर्य कायम राहावं आणि फिट दिसावं यासाठी अमृता याची कटाक्षाने काळजी घेत असते. मात्र, काही दिवसांपूर्वीच अमृताने अशी एक गोष्ट केली की, ज्यामुळे तिच्या जीवनात आमूलाग्र असा बदल झाला आहे. हे आम्ही नाही तर खुद्द अमृताने म्हटलं आहे. अमृतानं काही दिवसांपासून योगासनं आणि शीर्षासनाचे धडे घेण्यास सुरुवात केली आहे. सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर तिनं याची माहिती दिली आहे. गेल्या काही काळापासून नेहमीचा व्यायाम किंवा वर्कआऊट करत होतो. मात्र, त्यातून मानसिक समाधान मिळत नव्हतं. याच कारणामुळे काही तरी वेगळे करण्याच्या विचारात होते, असं अमृताने ट्विटरवर नमूद केले आहे. तेव्हा एका मित्राने योगगुरुची ओळख करून दिल्याचे तिनं म्हटलं आहे. त्यांच्याकडे अमृताने योगासनांचे धडे घेण्यास सुरुवात केली. त्यांना भेटल्यानंतर आपल्याला वर्कआऊटपेक्षा मानसिक वर्कआऊटची गरज होती, हे उमगल्याचे अमृताने म्हटले आहे. योगासनं आणि त्यांचे प्रशिक्षण आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवत असल्याचे तिनं म्हटलं आहे. त्यांनी शिकवलेली प्रत्येक गोष्ट खास असून नवचैतन्य निर्माण करत असल्याचे अमृताने ट्विटरवर सांगितले आहे. पहिल्याच भेटीत चैतन्यजींना शीर्षासन शिकायचं आहे, असं सांगितलं होतं. त्यावर ते हसले आणि म्हणाले की एखादी गोष्ट मिळवण्यासाठी त्या प्रक्रियेतून जाणं गरजेचे आहे. ती प्रक्रियासुद्धा हवं ते मिळवण्याइतकीच आनंददायी असून तिथूनच नव्या प्रवासाची सुरुवात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या बोलण्याचा अर्थ आपल्याला योगासन शिकतानाच्या काळात उमगल्याचे अमृताने सांगितले. योगासने करत करत अखेर अमृता शीर्षासनसुद्धा शिकली आहे. त्याचा फोटोसुद्धा तिनं ट्विटरवर शेअर केला आहे. अभिनेत्री आणि नच बलियेची विजेती असलेल्या अमृतानं काहीच अशक्य नसल्याचे दाखवून दिलं आहे. आता भविष्यात ती आणखी कोणती आव्हानात्मक गोष्ट करणार याकडं साऱ्यांच्या नजरा लागल्यात.

Web Title: Amrita Yogasana and Shirshasan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.