"मी त्याला साताऱ्याला वनवास भोगायला पाठवलं अन्..."; अमृताने प्रसादसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 10:29 AM2024-10-28T10:29:33+5:302024-10-28T10:30:45+5:30

प्रसाद जवादेने झी गौरव पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार जिंकल्यावर त्याची पत्नी अमृताने त्याच्यासाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे (prasad jawade, amruta deshmukh)

amruta deshmukh special post for prasad jawade after he won zee gaurav award 2024 | "मी त्याला साताऱ्याला वनवास भोगायला पाठवलं अन्..."; अमृताने प्रसादसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

"मी त्याला साताऱ्याला वनवास भोगायला पाठवलं अन्..."; अमृताने प्रसादसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

झी गौरव पुरस्कार २०२४ नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात झी मराठीमधील टीव्ही मालिकांमधील कलाकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पारू मालिकेसाठी अभिनेता प्रसाद जवादेला सर्वोत्कृष्ट नायक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रसादची पत्नी आणि अभिनेत्री अमृता देशमुखने लाडक्या नवऱ्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. त्यावेळी अमृताने तिच्या भावना पोस्टमध्ये व्यक्त केल्यात.

अमृता देशमुखने प्रसादचा व्हिडीओ शेअर करुन लिहिलंय की,  "मी प्रसादच्या प्रेमात पडायच्या आधी त्याच्या डोळ्यांच्या प्रेमात पडले होते...अतिशय बोलके आणि भावपूर्ण डोळे..त्याच्यापेक्षा त्याचे डोळेच जास्त नीट व्यक्त होऊ शकतात खरंतर. पारु सिरिअल मधला आदित्य बघताना त्रास होतो की आत्तापर्यंत ज्या सगळ्या छटा मी बघत होते आज पूर्ण महाराष्ट्र बघतोय ! आपल्या आवडीचं एखादं not-so-explored गाणं, अचानक viral झाल्यावर जो त्रास होतो तसं काहीसं.."


अमृता शेवटी लिहिते की, "पण झी मराठी आणि " पारु"मुळे प्रसाद आज लोकांच्या मनात viral होतोय हे जाणवतंय आणि छान वाटतंय! लग्न झाल्याझाल्या मी त्याला साताऱ्यात वनवास भोगायला पाठवलं.  खूप अडचणी आल्या, काही त्याने निर्माण केल्या. पण action-cut मध्ये त्याने कधीच तडजोड केली नाही..आणि त्यामुळेच त्याने "सर्वोत्कृष्ट नायक" ह्या मृगाची शिकार केली ! So proud of you प्रसाद जवादे."

Web Title: amruta deshmukh special post for prasad jawade after he won zee gaurav award 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.