'चंद्रमुखी' मध्ये आदिनाथ नको होता... अमृता खानविलकरने घेतलं दुसऱ्याच अभिनेत्याचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 12:05 PM2023-08-30T12:05:50+5:302023-08-30T12:07:07+5:30

मला आजही असं वाटतं की दौलत हे पात्र त्यानेच करायला हवं होतं, अमृता नेमकं कोणाबद्दल बोलतेय?

amruta khanvilkar said prasad oak should have played daulatrao character in chandramukhi instead of adinath kothare | 'चंद्रमुखी' मध्ये आदिनाथ नको होता... अमृता खानविलकरने घेतलं दुसऱ्याच अभिनेत्याचं नाव

'चंद्रमुखी' मध्ये आदिनाथ नको होता... अमृता खानविलकरने घेतलं दुसऱ्याच अभिनेत्याचं नाव

googlenewsNext

मराठीत सध्याच्या काळात अनेक दर्जेदार चित्रपट येत आहेत. 'झिम्मा', 'बाईपण भारी देवा', 'वाळवी', 'महाराष्ट्र शाहीर' यांसारखे अनेक सिनेने एकामागोमाग एक रिलीज झालेत आणि सुपरहिटही ठरले आहेत. दरम्यान प्रसाद ओक दिग्दर्शित 'चंद्रमुखी' सिनेमालाही विसरुन चालणार नाही. अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिने चंद्रमुखी आणि तर आदिनाथ कोठारेने दौलतराव देशमानेची भूमिका साकारली. आता नुकतंच अमृताने एक असं विधान केलं ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं.

बऱ्याच वर्षांनी सुरु झालेल्या 'खुपते तिथे गुप्ते' कार्यक्रमात आगामी एपिसोडमध्ये अमृता खानविलकर हजेरी लावणार आहे. चंद्रा या तिच्या गाजलेल्या गाण्यावरच तिची एंट्री झाली. यावेळी अवधूत गुप्तेने नेहमीच्या फोटो सेंगमेंटमध्ये अमृताला प्रसाद ओकचा फोटो दाखवला. फोटो पाहून काय मनात आलं असं त्याने विचारलं असता अमृता म्हणाली, 'मला आजही असं वाटतं की दौलत हे पात्र त्यानेच करायला हवं होतं.' यावर अवधूतने विचारलं आता तुला भीती वाटत नाही का खऱ्या देशमानेला हे कळलं तर त्याला वाईट वाटेल? आता या प्रश्नावर अमृता काय उत्तर देते हे त्या एपिसोडमध्येच कळेल. 

२९ एप्रिल २०२२ रोजी रिलीज झालेला 'चंद्रमुखी' सिनेमा चांगलाच गाजला होता. सिनेमाचं दिग्दर्शन प्रसाद ओकने केलं होतं. या सिनेमासाठी सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली होती. आदिनाथ कोठारेची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. आता अमृताच्या या विधानाने आदिनाथ काय प्रतिक्रिया देतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Web Title: amruta khanvilkar said prasad oak should have played daulatrao character in chandramukhi instead of adinath kothare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.