अमृता सांगते, सरिताच्या भूमिकेसाठी जास्त मेहनत करावी लागली नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 02:03 PM2018-08-08T14:03:04+5:302018-08-08T14:06:57+5:30

अमृता ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय पोलिसाची पत्नी ‘सरिता’ हे पात्र साकारुन प्रेक्षकांना पुन्हा एकदा सरप्राईज करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Amruta Khanvilkar says that sarita character in satyamev jayate is quite easy | अमृता सांगते, सरिताच्या भूमिकेसाठी जास्त मेहनत करावी लागली नाही

अमृता सांगते, सरिताच्या भूमिकेसाठी जास्त मेहनत करावी लागली नाही

googlenewsNext
ठळक मुद्देमनोज वाजपेयी व अमृता खानविलकर दिसणार नवऱ्या बायकोच्या भूमिकेत ‘सत्यमेव जयते’ १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमीच एकापेक्षा एक दमदार पात्र साकारुन प्रेक्षकांना सरप्राईज करत असते. ज्याप्रमाणे कथेत नाविन्य असते त्याचप्रमाणे अमृताने साकारलेल्या प्रत्येक पात्राची छटा ही जरा वेगळी असते आणि या निमित्तानेच अमृताला विविध रुपात पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळते आहे.

मेघना गुलझार दिग्दर्शित ‘राझी’ या चित्रपटात अमृताने पाकिस्तानी आर्मीची पत्नी ‘मुनिरा’ आणि त्यानंतर ‘डॅमेज’ या वेब सिरीजमधील ‘लोव्हीना’ हे सिरीयल किलरचे पात्र साकारले होते. या सर्व पात्रांच्या सादरीकरणानंतर अमृता ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय पोलिसाची पत्नी ‘सरिता’ हे पात्र साकारुन प्रेक्षकांना पुन्हा एकदा सरप्राईज करण्यासाठी सज्ज झाली आहे.
मिलाप झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात अमृता अभिनेते मनोज वाजपेयी यांच्या पत्नीची म्हणजेच सरिताची भूमिका साकारत आहे. अमृतासाठी सरिताची भूमिका ही अगदी सोपी होती, यासाठी तिला विशेष असे कष्ट घ्यावे लागले नाही. कारण खऱ्या आयुष्यात जसा अमृताचा स्वभाव आहे अगदी तसाच हुबेहूब सरिताचा आहे. जसे की आपली अमृता जशी खोडकर, मस्तीखोर, प्रेमळ तशीच सरिता देखील आहे. विशेष म्हणजे काय बरोबर, काय चूक याची
योग्य जाणीव जशी अमृताला आहे तशीच सरिताला पण आहे. या चित्रपटाच्या आणि पात्राच्या निमित्ताने अमृताचा खरा स्वभाव आणि तिचे विचार या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळेल. तसेच मनोज बाजपेयी आणि मनमिळावू अमृता यांची पती-पत्नीची ऑन-स्क्रिन केमिस्ट्री कशी असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मिलाप झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असून हा चित्रपट येत्या १५ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Amruta Khanvilkar says that sarita character in satyamev jayate is quite easy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.