अमृता खानविलकरच्या नवीन सिनेमाचं होतंय कौतुक! तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 02:17 PM2024-10-20T14:17:31+5:302024-10-20T14:28:06+5:30

अमृता खानविलकरच्या नुकत्याच रिलीज झालेल्या सिनेमाचं चांगलंच कौतुक होतंय (amruta khanvilkar)

अभिनेत्री अमृता खानविलकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. अमृताला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय

अमृता खानविलकरच्या एका सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. सिनेमाचा अनोखा विषय आणि त्याची नाविन्यपूर्ण मांडणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय

या सिनेमाचं नाव 'लाईक आणि सबस्क्राईब'. अमृता खानविलकरसोबत या सिनेमात अमेय वाघ प्रमुख भूमिकेत आहे

रहस्यमयी थ्रिलर कथानक असलेला 'लाईक आणि सबस्क्राईब' सिनेमा रिलीज होताच हाऊसफुल्ल गर्दीत सुरु आहे

'लाईक आणि सबस्क्राईब' सिनेमात अमृताने दीपिका ही भूमिका साकारली आहे. याशिवाय या सिनेमातून अभिनेत्री जुई भागवतने पदार्पण केलंय

अमृता खानविलकरने 'लाईक आणि सबस्क्राईब' सिनेमातून नॉन ग्लॅमरस व्यक्तिरेखा साकारल्याने तिचे चाहते कौतुक करत आहेत

अमृता खानविलकरने राजी, फूंक, सत्यमेव जयते अशा हिंदी सिनेमातही अभिनय करुन भूमिका गाजवल्या आहेत