'छोट्या रफी'च्या आवाजानं आनंद महिंद्रा प्रभावित, शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 10:00 AM2020-09-13T10:00:53+5:302020-09-13T10:01:33+5:30

हा व्हिडीओ पाहून महिंद्रा समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी त्यांचे कौतुक केले आहे. त्यांनी त्याचा व्हिडीओही शेअर केला आहे.

anand mahindra shares video of man singing mohammed rafi songs | 'छोट्या रफी'च्या आवाजानं आनंद महिंद्रा प्रभावित, शेअर केला व्हिडीओ

'छोट्या रफी'च्या आवाजानं आनंद महिंद्रा प्रभावित, शेअर केला व्हिडीओ

googlenewsNext

नवी दिल्ली- महान गायक मोहम्मद रफीचे चाहते अजूनही त्यांच्या आवाजाचे कौतुक करतात. आजही लोक त्यांची गाणी ऐकतात आणि त्याच्या आवाजानं मंत्रमुग्ध होतात. यामुळेच त्यांची गाणी प्रत्येकाच्या जिभेवर कायम असतात. त्यांच्या गाण्यांपैकी एखादं-दुसरं गाणं आठवत नसल्याचं क्वचितच घडले असेल. असाच एक तरुण केरळचा आहे. तो त्यांच्या आवाजात मोहम्मद रफी यांचे गाणे गातो. त्याच्या आवाजामुळे लोक त्याला 'छोटा रफी' म्हणून संबोधतात. तो मोहम्मद रफीचे गाणे गात असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून महिंद्रा समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी त्यांचे कौतुक केले आहे. त्यांनी त्याचा व्हिडीओही शेअर केला आहे.

सौरव किशन असे या तरुणाचे नाव आहे. तो केरळमधील कोझिकोडचा रहिवासी आहे. तो मोहम्मद रफीच्या गाण्यांना आवाज देतो. त्याचे मित्र आणि स्थानिक त्याच्या आवाजाचे कौतुक करतात. ते त्याला छोटा रफी म्हणतात. त्याचा व्हिडीओ जुडीश राज नावाच्या वापरकर्त्याने ट्विटरवर शेअर केला होता, जो नंतर आनंद महिंद्रांनी शेअर केला.

आनंद महिंद्रांनी व्हिडीओ शेअर केला आणि लिहिले, 'आम्ही शतकानुशतके नवीन मोहम्मद रफीची वाट पाहत आहोत. आता असे दिसते की, आपल्याला जास्त दिवस थांबावे लागणार नाही. मी ही व्हिडीओ क्लिप ऐकायची बंद करू शकत नाही. ' या व्हिडीओमध्ये सौरव किशन मोहम्मद रफी यांचे प्रसिद्ध गाणे 'तेरी आंखें के सिवा' गात आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत पाच दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे. तसेच त्याला 14 हजार लाईक्स मिळाले आहेत.

Web Title: anand mahindra shares video of man singing mohammed rafi songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.