बॉलिवूडमध्ये 25 वर्षं झाल्याचा आनंद- शाहरुख खान

By Admin | Published: June 26, 2017 05:01 PM2017-06-26T17:01:25+5:302017-06-26T17:01:25+5:30

बॉलिवूडचा किंग म्हणजेच शाहरुख खान याने त्याच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Anand-Shahrukh Khan is 25 years old in Bollywood | बॉलिवूडमध्ये 25 वर्षं झाल्याचा आनंद- शाहरुख खान

बॉलिवूडमध्ये 25 वर्षं झाल्याचा आनंद- शाहरुख खान

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - बॉलिवूडचा किंग म्हणजेच शाहरुख खान याने त्याच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळी किंवा ईद काहीही असलं तरी एकत्र येण्याचा आनंद वेगळाच असतो. मी खूप आनंदित आहे. मलाही परवाच समजलं की बॉलिवूडमध्ये मला 25 वर्षं झाली. मात्र मला वाटतं बॉलिवूडमध्ये 26 ते 27 वर्ष झाली असावीत. तरीही 25 वर्ष हा खूप मोठा काळ असतो. लोकांनी मला एवढे वर्षं प्रेम दिलं त्याबद्दल मी आभारी आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना शाहरुखनं ईदनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.  

ईदच्या दिवशी सर्वांना भेटून आनंद होतो. मला पाहण्यासाठी लोक वेगवेगळ्या शहरांतून येतात. बंगल्याबाहेर चाहत्यांची गर्दी होत असल्यानं ब-याचदा वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे वाहनचालकांसह आजूबाजूच्या लोकांना होणा-या त्रासाबाबत मी दिलगीर आहे. ईदच्या निमित्तानं घरात लंच पार्टी ठेवली आहे. तुम्हा सगळ्यांसोबत ईद साजरी करायला आवडते, असंही शाहरुख खान म्हणाला आहे.

सलमान खानचा ट्युबलाइट सिनेमा मला खूप आवडला, असं म्हणत शाहरुखनं सलमानचीही स्तुती केली. ईदच्या निमित्तानं शाहरुख खाननं बंगल्याबाहेर आतुरतेने वाट पाहणा-या चाहत्यांना मुलगा अबराम याची ओळख करून दिली. तसेच तुम्ही सगळे माझ्याच घरात यावेत, यासाठी नक्कीच प्रयत्न करेन. पत्रकारांनी जब हैरी मेट सेजल या चित्रपटातील इंटरकोर्स हा शब्दावर प्रश्न उपस्थित केल्यावर शाहरूखनंही त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. तुम्ही आधी चित्रपट पाहा मग तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ समजेल, असं तो म्हणाला. शाहरुखनं स्वतःच्या मुलीबाबतही मनमोकळ्या गप्पा मारल्या. माझ्या मुलीला अभिनेत्री बनायचं असल्यास तिनं स्वतःचं शिक्षण आधी पूर्ण करावं. कमीत कमी मुलांकडे ग्रॅज्युएशनचीही पदवी तरी असायलाच हवी, असंही शाहरुख खान म्हणाला आहे.  

Web Title: Anand-Shahrukh Khan is 25 years old in Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.