Kim and Khloe Kardashian : किम कार्दशियनची बहिण पडता पडता वाचली! सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 12:13 PM2024-07-14T12:13:10+5:302024-07-14T12:13:33+5:30
किम कार्दशियन आणि ख्लो कार्दशियनने लग्नातील आपल्या देसी लूकने सगळ्यांना वेड लावलं.
भारताचे सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्न सोहळा शुक्रवारी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडला. या शाही लग्नाला केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या भव्यदिव्य लग्नासाठी जगप्रसिद्ध हॉलिवूडसेलिब्रिटी किम कार्दशियन आणि तिची बहीण ख्लो कार्दशियन मुंबईत आल्या. किम कार्दशियन आणि ख्लो कार्दशियनने लग्नातील आपल्या देसी लूकने सगळ्यांना वेड लावलं. यासोबतच अनंत आणि राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्यातही दोन्ही बहिणींच्या पारंपरिक स्टाईलची सगळीकडे चर्चा होत आहे. यातच त्यांच्या एका व्हिडीओनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
किम आणि ख्लो अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या 'शुभ आशिर्वाद' सोहळ्यात सहभागी होण्यासाठी हॉटेलमधून निघाल्या. या दोघांची झलक पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली. जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत कार्दशियन बहिणी ताज हॉटेलमधून सोहळ्यासाठी जाण्यास बाहेर पडताना दिसतायत. तेवढ्यात ख्लोईचा पाय घसरतो आणि ती पडता पडता वाचते. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
'शुभ आशिर्वाद' सोहळ्यासाठीदेखील किमने सिल्वर वर्क असलेला फिकट रंगाचा लेहेंगा घातला. किमने लॉरेन हिऱ्यांच्या दागिन्यांसह तिचा लूक स्टाइल केला आहे. किमच्या मोठ्या नथनीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तर Khloe Kardashianv ही गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात दिसली. या दोघींची स्टाईल इतकी किलर होती की सगळेच त्यांच्याकडे बघतच राहिले.
सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या पोस्ट वेडिंग फंक्शनकडे सर्वांच्या नजरा आहेत. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचे 'मंगल उत्सव' किंवा लग्नाचे रिसेप्शन हे १४ जुलै रोजी आयोजित केले आहे. तर, १५ जुलै रोजी मुंबईत दुसरी रिसेप्शन पार्टी आयोजित केली जाणार आहे. या कार्यक्रमातही कार्दशियन बहिणी सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतली, यात शंका नाही.