'कर्णसंगिनी'मध्ये ह्या भूमिकेत दिसणार अनंत जोशी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 07:15 AM2018-11-20T07:15:00+5:302018-11-20T07:15:00+5:30

स्टार प्लस वाहिनीवरील 'क्या कसूर है अमला का?' मालिकेत देवच्या रूपात दिसून आलेला अनंत जोशी आता पुन्हा एकदा स्टार प्लसवर दिसणार आहे.

Anant Joshi to appear in 'Karanasangini' | 'कर्णसंगिनी'मध्ये ह्या भूमिकेत दिसणार अनंत जोशी

'कर्णसंगिनी'मध्ये ह्या भूमिकेत दिसणार अनंत जोशी

googlenewsNext
ठळक मुद्दे'कर्णसंगिनी'मध्ये कृष्णाच्या रूपात दिसणार अनंत जोशीकृष्णाची भूमिका साकारण्यासाठी अनंत खूप उत्सुक


स्टार प्लस वाहिनीवरील 'क्या कसूर है अमला का?' मालिकेत देवच्या रूपात दिसून आलेला अनंत जोशी आता पुन्हा
एकदा स्टार प्लसवर दिसणार आहे. याआधी त्याने खलनायकी भूमिका केली असून आता मात्र शशी-सुमीत यांच्या 'कर्णसंगिनी'मध्ये तो कृष्णाच्या रूपात दिसून येईल.


अनंत जोशी म्हणाला, 'मी आधीही स्टार प्लससोबत काम केले आहे. त्यामुळे मला घरी परतण्यासारखे आहे. मी आजपर्यंत साकारलेल्या सर्व व्यक्तिरेखा वास्तविक होत्या आणि आता प्रथमच मी मायथो-रोमांस प्रकारात काम करणार आहे. कृष्णाची भूमिका साकारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. ही व्यक्तिरेखा माझ्यासाठी खूप आव्हानात्मक आहे आणि मी त्यासाठी तयारी सुरू केली आहे. एक अभिनेता म्हणून माझ्या कक्षा रूंदावण्यासाठी मला मदत होईल.'
तो पुढे म्हणाला, 'पौराणिक मालिकेमध्ये काम करण्याबद्दलही मी खूप आनंदात आहे. मी असा काही फरक करत नाही. एक अभिनेता म्हणून व्यक्तिरेखा साकारणे माझे काम आहे. त्याशिवाय पौराणिक कथा मला धर्म आणि पुराणाबद्दल अधिक माहिती प्रदान करेल.'
महाभारताच्या पार्श्वभूमीवरील 'कर्णसंगिनी' या मालिकेत सामाजिक प्रथेच्या विरोधात जाऊन जातीबाहेर टाकलेल्या राजा कर्णशी लग्न करणाऱ्या उरुवीची कथा सादर करण्यात आली आहे. या मालिकेत गौतम गुलाटी, मदिराक्षी मुंडले मुख्य भूमिकेत आहेत. 'कर्णसंगिनी' ही कविता काणे यांची कादंबरी 'कर्णाज्‌ वाईफः दि आऊटकास्ट क्वीन'वर आधारित आहे. या मालिकेत सामाजिक प्रथेच्या विरोधात जाऊन जातीबाहेर टाकलेल्या राजा कर्णशी लग्न करणाऱ्या उरुवीची कथा सादर करण्यात आली आहे. महाकाव्य महाभारताची माहिती नसलेली बाजू या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

Web Title: Anant Joshi to appear in 'Karanasangini'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.