'या' तरुणाला डेट करतेय अनन्या पांडे? अंबानीं कुटुंबाशी आहे खास कनेक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 02:16 PM2024-09-11T14:16:53+5:302024-09-11T14:17:56+5:30

आता अनन्याने तिच्या गळ्यात एक विशेष पेंडेंट घालून अफेअरच्या चर्चांना खतपाणी घातलं आहे.

Ananya Panday is dating Walker Blanco special connection with the Ambani family flaunts W pendant | 'या' तरुणाला डेट करतेय अनन्या पांडे? अंबानीं कुटुंबाशी आहे खास कनेक्शन!

'या' तरुणाला डेट करतेय अनन्या पांडे? अंबानीं कुटुंबाशी आहे खास कनेक्शन!

अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday)  सध्या तिच्या Call Me Bae  या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. नुकतंच तिची ही सीरिज Amazon Prime वर प्रदर्शित झाली असून त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पण आता आणखी एका खास कारणामुळे अनन्याने पुन्हा एकदा लोकांचे लक्ष वेधले आहे. अलिकडेच अनन्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे, ज्यात तिने W नावाचा पेडेंट परिधान केल्याचं दिसून येत आहे. यावरुन अनन्या ही कुणाला डेट करतेय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

आता अनन्याने तिच्या गळ्यात एक विशेष पेंडेंट घालून अफेअरच्या चर्चांना खतपाणी घातलं आहे. 'W' अक्षर असलेले पेंडेंटचा अर्थ नेटकऱ्यांनी लावला आहे. अनन्या ही वॉकर ब्लँको (Walker Blanco) ला डेट करत असल्याचं समोर आलं आहे.  दोघांनीही एकमेंकाना इन्स्टाग्रामवर फॉलो केलं आहे. एवढचं नाहीतर अन्याची बेस्टफ्रेंड सुहाना खान हिनेदेखील वॉकर ब्लँकोला इन्स्टाग्रामवर फॉलो केललं आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अनन्याची Call Me Bae ही सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर रुमर्ड बॉयफ्रेंड वॉकरनेही अनन्याचे कौतुक केलं होतं. त्याने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. ही  पोस्ट त्याने अनन्याला टॅगही केली होती.  आदित्य रॉय कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर या अभिनेत्रीचे नाव क्रिकेटर हार्दिक पांड्यासोबत जोडले जात होतं. पण, हार्दिकला नाहीतर अनन्या ही वॉकर ब्लँको या विदेशी तरुणाला डेट करत आहे. मात्र, याबाबत अद्याप अनन्याने कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. 


इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनदरम्यान क्रूझ पार्टीमध्ये अनन्या वॉकरला भेटली होती. शिवाय, राधिका आणि अनंतच्या लग्नात दोघांचे डान्स करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, अनन्या वॉकरला क्रूझवर भेटली आणि दोघांमध्ये चांगले बॉण्डिंग निर्माण झाले. दोघेही एकमेकांना ओळखत आहेत आणि त्यांच्यात घट्ट मैत्री आहे. वॉकर हा जामनगरमध्ये राहतो आणि अंबानींसाठी वांतारा ॲनिमल पार्कमध्ये काम करतो. 

Web Title: Ananya Panday is dating Walker Blanco special connection with the Ambani family flaunts W pendant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.