अभिनेते पुनीत राजकुमार यांच्या निधनाची बातमी देताना अँकरला कोसळले रडू, व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 04:15 PM2021-10-30T16:15:55+5:302021-10-30T16:16:10+5:30
कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार यांचे कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झाले.
कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले आहे. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर कन्नड सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनावर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार, दिग्दर्शक, क्रिकेटपटू, राजकारणातील दिग्गजांनी त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसतो आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हिडीओत पुनीतच्या निधनाची बातमी देत असताना, कन्नड न्यूज चॅनेल BTVच्या अँकरला रडू कोसळले. त्यानंतर तिचे सहकारी तिचे सांत्वन करत असताना पहायला मिळत आहे.
A #BTV news anchor in #Bengaluru broke down while reading the news of #PuneethRajkumardeath.
— dinesh akula (@dineshakula) October 29, 2021
People are shocked with the untimely death of sandalwood power star. He was just 46 and heart attack claimed his life. pic.twitter.com/uwNNeSvk2n
पुनीत राजकुमार यांचे कार्डिएक अरेस्टमुळे निधन झाले. शुक्रवारी सकाळी त्यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना बंगळुरू येथील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.
पुनीत 'अप्पू' या नावाने ओळखले जात होते
पुनीत राजकुमार हे दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत लोकप्रिय नाव आहे. कन्नड चित्रपटांमध्ये त्यांचा दबदबा असून त्यांनी २९ पेक्षा जास्त हिट चित्रपट दिले आहे. पुनीत यांनी बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती. बेट्टाडा हूवू असे त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे नाव होते. हा चित्रपट १९८५ मध्ये रिलीज झाला होता. इतकेच नाही तर त्यांना कर्नाटक राज्य पुरस्कार सोहळ्यामध्ये बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुनीत यांना अप्पू या नावाने ओळखले जाते. २००२ मध्ये त्यांना ही ओळख मिळाली. ‘अभी’, ‘वीरा कन्नडिगा’, ‘अजय’, ‘अरासु’, ‘राम’, ‘हुडुगारु’ आणि ‘अनजनी पुत्र’ यांसारख्या चित्रपटात त्यांनी काम केले आहे. शेवटचे ते युवारथ्ना या चित्रपटात झळकले आहेत.