आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये पावसाचा कहर; आपत्तीग्रस्तांसाठी महेश बाबूने केली मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 11:55 AM2024-09-04T11:55:07+5:302024-09-04T11:55:27+5:30
तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळेहजारो एकर शेतजमीन पाण्यात बुडाली आहे. बचाव आणि पुनर्वसन कार्यासाठी एजन्सी तैनात करण्यात आल्या आहेत.
अतिवृष्टी आणि पुरामुळे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये विध्वंस सुरू आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारांनी बाधित भागात मदतकार्य सुरू केलं आहे. सततचा पाऊस आणि पुरामुळे अनेक रस्ते वाहून गेले. याशिवाय हजारो एकरमधील पिकंही नष्ट झाली. दैनंदिन गरजेच्या वस्तूंसाठीही लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अभिनेता महेश बाबूनेआंध्र प्रदेश आणि तेलंगणाला मदत करत पीडितांसाठी प्रार्थना केली आहे.
महेश बाबूने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. महेश बाबूने लिहिलं आहे की, "दोन्ही तेलुगू राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांसाठी प्रत्येकी ५० लाख रुपये मुख्यमंत्री मदत निधीला देण्याचा संकल्प करतो. पूरग्रस्त भागांसाठी तत्काळ मदत आणि पुनर्वसन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारांकडून हाती घेतलेल्या उपाययोजनांना पाठिंबा देऊ या. मी सर्वांना या कार्यात योगदान द्यावे असे आवाहन करतो. आपण या संकटातून वर येऊ आणि मजबूत होऊया".
In light of the floods impacting both the Telugu states, I am pledging a donation of 50 lakhs each to the CM Relief Fund for both AP and Telangana. Let’s collectively support the measures being undertaken by the respective governments to provide immediate aid and facilitate the…
— Mahesh Babu (@urstrulyMahesh) September 3, 2024
यापूर्वी ज्युनियर एनटीआरने आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील पूरग्रस्तांसाठी 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. 'कल्की' चित्रपटाच्या टीमनेही दोन्ही राज्यांना मदत केली आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. लाखो लोकांना याचा फटका बसला आहे. तेथे बचावकार्य सुरू आहे. , मदत आणि बचाव कार्यासाठी एसडीआरएफच्या २० टीम आणि एनडीआरएफच्या १९ टीम कार्यरत आहेत.