अंग्रेजी मीडियमनंतर इरफान खानने घेतला मोठा निर्णय, चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 02:08 PM2020-03-12T14:08:05+5:302020-03-12T14:29:25+5:30

निर्माता दिनेश विजन अंग्रेजी मीडिया सिनेमा शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे.

Angrezi medium film irrfan khan treatment still going on in mumbai hospital gda | अंग्रेजी मीडियमनंतर इरफान खानने घेतला मोठा निर्णय, चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी

अंग्रेजी मीडियमनंतर इरफान खानने घेतला मोठा निर्णय, चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी

googlenewsNext

निर्माता दिनेश विजन अंग्रेजी मीडिया सिनेमा शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. या सिनेमातील मुख्य अभिनेता असलेल्या इरफान खानने कँसरवर उपचार घेतानाच शूटिंग पूर्ण केली आहे. सध्या इरफानवर मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. अमर उजालाच्या रिपोर्टनुसार कँसरवरील उपचार पूर्ण झाल्यानंतरच इरफान आता पुढील सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्यामुळे आता त्याच्या आगामी सिनेमाची शूटिंग कधी सुरु होईल यावर प्रश्न चिन्ह आहे.   

 
या सिनेमाचे प्रमोशन करताना ना तर करीना कपूर दिसली ना इरफान खान. दीपक डोबरियाला आणि राधिका मदान हे कलाकार सिनेमाचे प्रमोशन करताना दिसतायेत. सिनेमाची शूटिंग दरम्यान इरफानची तब्येत फारशी ठिक नाही आहे. प्रत्येक सीननंतर त्याला खुर्चीत जाऊन बसावं लागायचं. 


काही दिवसांपूर्वीच सिनेमाची ट्रेलर रिलीज झाला होता. यात इरफान खान त्याच्या मुलीच्या शाळेत भाषण देताना दिसत आहे. त्यानंतर त्याची मुलगी त्याला परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा बोलून दाखवते. मात्र या यासाठी पैसा कुठून आणायचा, असा प्रश्न उभा ठाकतो. पण प्रसंगी स्वत:चे रक्त विकून तुझ्या फीचा पैसा उभा करेन, असे आश्वासन इरफान मुलीला जातो. 3 कोटीची रक्कम उभी करताना एका बापाच्या मार्गात काय काय अडचणी येतात, त्याचीच एक झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. हा ट्रेलर तुम्हाला हसवतो, विचार करायला लावतो. काही प्रसंगी डोळ्यात पाणीही आणतो आणि पुन्हा हसवण्यात यशस्वी ठरतो.

Web Title: Angrezi medium film irrfan khan treatment still going on in mumbai hospital gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.