अनिल कपूरचं 'या' अभिनेत्रीसोबत होतं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, संसार मोडता मोडता वाचला; कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 12:04 PM2024-10-09T12:04:29+5:302024-10-09T12:05:10+5:30

अभिनेत्री बोल्ड सीन्समुळे नेहमीच चर्चेत असायची.

Anil Kapoor had an ectra marrital affair with Kimi Katkar actor s wife about to leave him | अनिल कपूरचं 'या' अभिनेत्रीसोबत होतं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, संसार मोडता मोडता वाचला; कोण आहे ती?

अनिल कपूरचं 'या' अभिनेत्रीसोबत होतं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, संसार मोडता मोडता वाचला; कोण आहे ती?

बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेता अनिल कपूरची (Anil Kapoor) जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. अभिनेता दिवसेंदिवस तरुणच होत चालला आहे. वयाच्या ६७ व्या वर्षीही त्याची क्रेझ कमी झालेली नाही. ७० ते ८० च्या दशकात अनिल कपूरचे एकापेक्षा एक सिनेमे सुपरहिट झाले. माधुरी दीक्षित, श्रीदेवी, जुही चावला, राणी मुखर्जी अशा अनेक अभिनेत्रींसोबत त्याची जोडी गाजली. काही अभिनेत्रींसोबत त्याचं नावही जोडलं गेलं. अशीच एक अभिनेत्री जिच्यासोबत अनिल कपूरचं अफेअर सुरु झालं होतं ज्याची भनक त्याच्या पत्नीला लागली होती. 

अनिल कपूरने १९८४ साली सुनिता कपूरसोबत लग्नगाठ बांधली होती.त्याआधी दोघांनी ५ वर्ष एकमेकांना डेट केले होते. लग्नानंतर त्यांना दोन मुली आणि एक मुलगा झाला. अनिलचं वैवाहिक आयुष्य आणि करिअर दोन्ही सुरळीत सुरु होतं. मात्र अनिलच्या आयुष्यात वादळ आलं जेव्हा त्याचं अफेअर अभिनेत्री किमी काटकरसोबत (Kimi Katkar) सुरु झालं. अनिल कपूरने किमी काटकरसोबत अनेक सुपरहिट सिनेमे दिले. दोघांमध्ये जवळीक वाढली होती. इतकंच नाही तर अनिल प्रत्येक सिनेमासाठी निर्मात्यांकडे किमीचं नाव सुचवत होता. अनिलच्या अफेअरबद्दल त्याच्या पत्नीच्याही कानावर आलं पण तिने विश्वास ठेवला नाही.

मात्र एके दिवशी अनिल आणि किमी ज्या सिनेमात एकत्र काम करत होते त्या सेटवर सुनिता कपूर यांनी सरप्राईज भेट दिली. त्यावेळी त्यांनी अनिल आणि किमी एकत्र खोलीत वेळ घालवताना दिसले. यामुळे सुनिता कपूर भडकल्या आणि रागारागात मुलांना घेऊन घर सोडून गेल्या. पत्नी सोडून गेल्याने अनिल कपूर भानावर आला आणि त्याने पत्नीची माफी मागितली. तसंच यापुढे किमीसोबत कोणतेही संबंध ठेवणार नाही असा विश्वास दिला. यानंतर त्यांचा संसार मोडता मोडता राहिला.

किमी काटकर यशस्वी मॉडेल आणि अभिनेत्री होती. बोल्ड सीन्ससाठी ती जास्त ओळखली जायची. अनिलसोबत किमीने 'आग से खेलेंगे', 'हमला', 'काला बाजार' आणि 'सोने पे सुहागा' या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. 

Web Title: Anil Kapoor had an ectra marrital affair with Kimi Katkar actor s wife about to leave him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.