झक्कास, अभीं तो मैं जवान हूँ…..चिरतरुण अनिल कपूर यांचे हे फोटोत तुम्हालाही प्रेरणा देतील
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 02:40 PM2020-03-10T14:40:05+5:302020-03-10T14:41:17+5:30
आजच्या तरूणाईलाही लाजवेल असा सळसळता उत्साह आजही अनिल कपूरमध्ये पाहायला मिळतो.
आपल्या झक्कास अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेले अभिनेता म्हणजे अनिल कपूर. आजवर विविध चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत अनिल कपूर यांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. आजही अनिल कपूर चित्रपटसृष्टीत त्याच उत्साहाने आणि त्याच ताकदीने काम करत आहेत. अनिल कपूर यांचा उत्साह आजच्या तरुण कलाकारांना लाजवेल असाच आहे.
आजही अनिल कपूर चिरतरुण असल्याप्रमाणे भासतात. वयाची ६० ओलांडल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर तारुण्याची झळाळी दिसून येते. सध्या सोशल मीडियावर अनिल कपूर यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात अनिल कपूर वयानुसार अजिबात थकलेले वाटत नाही. उलट या वयातही त्यांचा उत्साह पाहून इतरांनाही नक्कीच प्रेरणा मिळेल हे मात्र नक्की. अनिल कपूर यांचे फोटो पाहून त्यांच्या चेहऱ्यावर वृद्धत्वाचा लवलेशही दिसत नाही.
मुळात अनिल कपूरही कितीही बिझी असले तरी आपल्या वर्कआऊटकडे दुर्लक्ष करत नाही. वर्कआऊटच्या काही सवयी त्यांनी स्वतःला लावून घेतल्या आहे. नित्यनियमाने आणि काटेकोरपणे पालन करतात. त्यांची फिटनेसबाबत असलेली ही सजगता आणि नियमित वर्कआऊट करणे यामुळे अनिल कपूर आजही फिट आणि आरोग्यदायी आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. त्यामुळेच की फिटनेसबाबत अनिल कपूर आज लाखो तरुणांचेही आदर्श आहेत.