महालप्रमाणे आलिशान आहे अनिल कपूरची लेक रियाचं घर, Inside photo बघून पडाल प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 04:02 PM2021-12-04T16:02:52+5:302021-12-04T16:06:18+5:30

रिया कपूर सोशल मीडियावर खूप सक्रीय असते.

Anil Kapoor's dughter Rhea kapoor's luxurious house inside photos | महालप्रमाणे आलिशान आहे अनिल कपूरची लेक रियाचं घर, Inside photo बघून पडाल प्रेमात

महालप्रमाणे आलिशान आहे अनिल कपूरची लेक रियाचं घर, Inside photo बघून पडाल प्रेमात

googlenewsNext

अनिल कपूरने आपल्या दोन्ही मुलींची लग्ने केली आहेत. सोनम कपूरनंतर या वर्षी ऑगस्टमध्येच त्याने आपली धाकटी मुलगी रिया कपूर (Rhea Kapoor) चं लग्न लावून दिलं. रिया करण बुलानी  (Karan Boolani) सोबत विवाह बंधनात अडकली.  12 वर्षांच्या नात्याला नवे नाव देत त्यांनी अत्यंत साधेपणाने घरात लग्न केले. लग्नानंतर रियाने तिच्या आलिशान घराची आतील झलक चाहत्यांना दाखवली, जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रिया कपूर आणि करण बुलानी यांनी मुंबईत स्वतःचा आलिशान आशियाना  बनवला आहे. रियाने तिच्या घराची ही छायाचित्रे एका मासिकासाठी काढली आहेत. रियाच्या या फोटोंमध्ये तिटा पतीहीसोबत दिसतो  आहे.

वोग मॅगझिनच्या कव्हरसाठी पोज देताना दोघेही खूप सुंदर दिसतं आहेत. फोटो शेअर करताना रियाने करण बुलानीला टॅग केले आणि लिहिले, 'हे घर करण आणि मी भाड्याने घेतले आहे, ज्यामध्ये आम्ही आमच्या श्वानासोबत राहतो'.

रिया कपूर सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती नेहमीच करण सोबत अनेक रोमँटिक फोटो पोस्ट करताना दिसते. करण एक फिल्ममेकर असून त्याने आजतागयत ५०० जाहिराती तयार केल्या आहेत. आयशा आणि वेक अप सिड सारख्या चित्रपटात करण बूलानीने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. इतकेच नाही तर अनिल कपूर सोबत सिलेक्शन डे या सिनेमात करणने काम केले आहे आणि लघुपटदेखील तयार केली आहे.

तसेच रिया कपूरच्या वर्कफ्रंट बाबतीत सांगायचे झाले तर रियाने आयशा आणि वीरे दी वेडिंग सारख्या चित्रपटाची निर्मीती केली आहे. रिया आणि सोनम कपूर यांनी एकत्र येऊन Rheson नामक फॉशन ब्रॅण्ड स्थापित केला आहे.
 

Web Title: Anil Kapoor's dughter Rhea kapoor's luxurious house inside photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.